महाराष्ट्र

maharashtra

Ambadas Danve on Political Crisis : 'सत्तासंघर्षाचा निकाल दिशादर्शक'

By

Published : May 11, 2023, 7:48 PM IST

Updated : May 11, 2023, 8:29 PM IST

राज्यातील सत्ता संघर्षाचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयात पार पडला. निकालानंतर अनेक नेते प्रतिक्रिया देत आहे. नैतिकता असेल तर आताच्या सरकारने तातडीने राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी, विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली.

Ambadas Danve on Political Crisis
विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे

संघर्षाचा निर्णयावर बोलताना विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे

छत्रपती संभाजीनगर : सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय सगळ्यांसाठी दिशादर्शक आहे. राज्यपालांनी जे निर्णय घेतले ते सुस्पष्टपणे बेकायदेशीर आहेत, त्यामुळे हे सरकार बेकायदेशीर आहे हे स्पष्ट झाले आहे. नैतिकता असेल तर आताच्या सरकारने तातडीने राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी, विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली. यंत्रणेचा वापर करून सरकार वाचवण्याचा प्रयत्न केले. राज्यपालांनी अधिवेशन बोलवले होते, त्याच काळात काही जणांनी गद्दारी केली होती. चिकटून राहणे हे उद्धव ठाकरे यांच्या तत्वात बसत नाही, आम्ही आता वीप बजाऊ शकतो मात्र, त्याचा चुकीचा उपयोग करणार नाही.

नैतिकता असेल तर आताच्या सरकारने तातडीने राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी -विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे


राजीनामा द्यावा:न्यायालयाच्या आजचा दिशादर्शक निकाल आहे. आमदार अपात्र करण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील हे माहिती होते, मात्र कोण घेतील हे आज स्पष्ट झाले. तर व्हीप कोणाचा हे देखील कळले. यातून सरकार बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट होते. शिवाजी पाटील निलंगेकर यांच्यावर किरकोळ आरोप झाले असताना, त्यांनी राजीनामा दिला होता. नैतिकतेचा आधार घेऊन शिंदे फडणवीस सरकारने राजीनामा द्यावा. हे सरकार बेकायदेशीर आहे हे स्पष्ट झाले. विधानसभा अध्यक्ष निर्णय घेतीलच. दिल्लीतील यंत्रणेचा वापर करून सरकार वाचवण्याचा प्रयत्न केला गेला. हे घटनाबाह्य सरकार असल्याचा आरोप विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला.

दिल्लीतील यंत्रणेचा वापर करून सरकार वाचवण्याचा प्रयत्न केला गेला - विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे


उद्धव ठाकरे प्रमुख राहतील: जनाची नाही तर, मनाचे तरी लाज राखली पाहिजे, कायदा सांगत असेल तर तो मान्य केलाच पाहिजे. शिवसेना कायद्याने, न्यायालयाच्या बाजूने आणि जनतेच्या मतावरच चालेल. न्यायालयानेच सांगितले की, हे सरकार घटनाबाह्य आहे. शिवसेना याची त्याची नाही तर, शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे. कार्यकारिणीने उद्धव ठाकरे यांना सर्वांच्या मताने प्रमुख जाहीर केलेले असल्याने, आता तेच प्रमुख असतील असे मत अंबादास दानवे यांनी व्यक्त केले.

हेही वाचा -

  1. SC on Uddhav Thackeray Resigns उद्धव ठाकरेंचा राजीमाना शिंदेफडणवीसांचा विनर पाईंट
  2. SC on Governor Floor Test Call राज्यपालांचा फ्लोअर टेस्ट बोलावण्याचा निर्णय अवैध सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
  3. Ujjwal Nikam Reaction सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निकालाने सरकारच्या स्थिरतेवर कोणताही परिणाम झालेला नाही उज्ज्वल निकम
Last Updated : May 11, 2023, 8:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details