महाराष्ट्र

maharashtra

गोदावरीला महापूर, 22 गावांचा संपर्क तुटला

By

Published : Jul 13, 2022, 9:13 PM IST

गोदावरीला पूर आला की नेहमी प्रमाणे सरला बेटावरील शिंदे वस्ती, सय्यद वस्ती ला पुराचा सर्वात आधी पुराचा वेढा बसतो वस्तीवर अंदाजे 100 कुटुंबातील नागरिक वास्तव्यास आहेत. 300 पेशा अधिक पाळीव जनावरे आहेत. त्यामुळे या कुटुंबापर्यंत ट्रॅक्टरद्वारे प्रशासनाने पोहचत सुरक्षितस्थळी रवाना होण्याची विनंती केली. मात्र या कुंटुबांनी पाणी इथपर्यंत पोहोचत नसल्याचे सांगितले. आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास बचाव कार्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

godavari river floods near vaijapur in aurangabad district
गोदावरीला महापूर

वैजापूर (औरंगाबाद) -गेल्या चार दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात पावसामुळे गोदावरी नदीला महापूर आला आहे. त्यामुळे अहमदनगरला जोडणारे पाच पूल पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे विविध धरणांतील पाणी नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरीत सोडले आहे. काल रात्री नदीपात्रातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यामुळे प्रवाह धोक्याच्या पातळीने वाहत आहे. डोणगाव, वांजरगाव, कमलपूर यासह नगरला जोडणारे वाहतूक पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. तहसीलदार राहुल गायकवाड, गटविकास अधिकारी कैलास जाधव, वीरगावचे सपाेनि शरद रोडगे यांनी भेट दिली. सराला बेट येथे गुरुवारी गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन केले होते. मात्र वांजरगाव येथून सराला बेटाला जोडणाऱ्या पुलापर्यंत पूर अाल्याने अधिकाऱ्यांनी सराला बेटाचे मंहत रामगिरी महाराज यांची भेट घेऊन बेटावरील गुरुपौर्णिमा कार्यक्रमाला भाविकांना प्रवेश देऊ नका अशी विनंती केली होती. त्यानुसार रामगिरी महाराजांनी बेटावरील कार्यक्रमाला भाविकांनी येऊ नये, असे आवाहन केले.


शिंदे वस्ती सय्यदवस्तीला पाण्याचा वेढा -गोदावरीला पूर आला की नेहमी प्रमाणे सरला बेटावरील शिंदे वस्ती, सय्यद वस्ती ला पुराचा सर्वात आधी पुराचा वेढा बसतो वस्तीवर अंदाजे 100 कुटुंबातील नागरिक वास्तव्यास आहेत. 300 पेशा अधिक पाळीव जनावरे आहेत. त्यामुळे या कुटुंबापर्यंत ट्रॅक्टरद्वारे प्रशासनाने पोहचत सुरक्षितस्थळी रवाना होण्याची विनंती केली. मात्र या कुंटुबांनी पाणी इथपर्यंत पोहोचत नसल्याचे सांगितले. आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास बचाव कार्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.



पाणी पातळी कमी होण्याची शक्यता -गेल्या चार दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात पावसाची संतप्तधार सुरू असल्याने गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ होत होती. मात्र आज सकाळी पाण्याने काहीसी उघडत दिल्याने पाणी पातळी कमी होऊ शकते, अशी प्रतिक्रियापाटबंधारे कार्यकारी अभियंता राकेश गुजरे यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details