महाराष्ट्र

maharashtra

Agriculture Schemes : शेतकऱ्यांसाठी खूशखबर! ट्रोल फ्री नंबरवर मिळणार कृषी योजनांची माहिती

By

Published : Jan 3, 2023, 8:37 PM IST

सरकारतर्फे शेतकऱ्यांना मदत व्हावी याकरिता विविध कृषी योजनांची (agriculture schemes) घोषणा केली जाते. मात्र या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाहीत. यावर उपाय म्हणून वंदे किसान तर्फे मोफत टोल फ्री क्रमांक सुरू ( agriculture schemes on troll free number) करण्यात आला. 8879712712 हा तो क्रमांक असून यावर मिस्ड कॉल देताच सर्व योजनांची माहिती मोबाईलच्या माध्यमातून मिळणार आहे.

troll free number
ट्रोल फ्री नंबर

वंदे मातरम् विकास फाऊंडेशनचे बिझनेस हेड प्रसाद कुलकर्णी माहिती देताना


औरंगाबाद : सरकार शेतकऱ्यांसाठी नेहमी वेगवेगळ्या योजना राबवत असते. मात्र, शेतकऱ्यांना या कृषी योजनांची (agriculture schemes ) माहिती होत नाही. यामुळे वंदे किसान तर्फे मोफत ट्रोल फ्री नंबर सुरू (agriculture schemes on troll free number) करण्यात आला आहे. या द्वारे आता शेतकऱ्यांना योजनांची माहिती घेणे सुलभ होणार आहे.

योजनांची माहिती मिळवण्याची प्रक्रिया : शेतकऱ्यांनी 8879712712 या क्रमांकावत मिस्ड कॉल दिल्यावर त्यांना एक लिंक पाठवली जाईल, ह्या लिंक वर क्लीक केल्यावर शेतकऱ्यांना व्हाट्स अप ग्रुपवर समाविष्ट करून घेतले जाईल. ज्यामध्ये कृषी विभाग, मत्स्य विभाग, पशु संवर्धन, हॉर्टिकल्चर सारख्या विविध विभागांच्या आणि बँकांच्या योजनांची माहिती अत्यंत सध्या भाषेद्वारे समजावून सांगितली जाईल. ही सेवा शेतकऱ्यांसाठी संपूर्णपणे मोफत असेल. अशी माहिती वंदे मातरम् विकास फाऊंडेशनचे बिझनेस हेड प्रसाद कुलकर्णी यांनी दिली.



कृषी प्रदर्शनात लोकार्पण : शेतकऱ्यांसाठी नवनवीन तंत्रज्ञान अवगत व्हावं, शेतीतील आधुनिक पद्धती अवगत व्हाव्या याकरिता सिल्लोड येथे कृषी प्रदर्शन भरवण्यात आले. वंदे मातरम् विकास फाऊंडेशन तर्फे देण्यात येणारी सुविधा शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असल्याने प्रदर्शनात कृषी मंत्री अब्दूल सत्तार ह्यांच्या हस्ते सिल्लोड येथील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात मोफत टोल फ्री क्रमांकाचे लोकार्पण करण्यात आले. सर्वांना समजेल अशा भाषेत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने नक्कीच फायदा होईल, इतकंच नाही तर शेतकरी आत्महत्या थांबण्यास मदत होईल, असा विश्वास वंदे मातरम् विकास फाऊंडेशनचे बिझनेस हेड प्रसाद कुलकर्णी यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details