महाराष्ट्र

maharashtra

Police Firing Takli Fata : पोलिसांना टोम्पोखाली चिरडण्याचा प्रयत्न, पोलिसांचा गोळीबार

By

Published : Aug 13, 2023, 10:48 PM IST

औरंगाबादच्या केंब्रिज चौकातील टाकळी फाटा येथे पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न (Attempt to crush police) करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या गाडीवर बचावासाठी गोळीबार केल्याची घटना घडली आहे.

Police Firing Takli Fata
Police Firing Takli Fata

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करण्यात (Attempt to crush police) आला आहे. विशेष म्हणजे या गाडीवर पोलिसांनी बचावासाठी गोळीबार (Police firing at Takli Fata of Aurangabad) केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. औरंगाबादच्या केंब्रिज चौकातील टाकळी फाटा येथे ही घटना आहे. औरंगाबाद ग्रामीणच्या गुन्हे शाखेने वाहन थांबविण्याचा प्रयत्न केल्यानंतर थेट पोलीस पथकाच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे. दरम्यान, पोलिसांनी बचावासाठी आरोपींवर दोन राऊंड फायर केल्याची माहिती समोर येत आहे. यातील दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले असून एकजण फरार झाला आहे.


नाकाबंदी करत असताना घडला प्रकार :रविवारी सायंकाळी जालना रस्त्यावरील केंब्रिज चौकात नियमित स्वरूपाची नाका बंदी ग्रामीण पोलिसांतर्फे करण्यात आली. त्यावेळी संशयास्पद स्वरूपातील एक ट्रक येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी अधिक तपासणी केली असता त्यांना एक टेम्पो ट्रक येताना दिसला. पोलिसांनी या टोम्पोला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी गोळीबार करताच आरोपींनी बीड रस्त्यावर पळ काढला. केंब्रिज चौकातील टाकळी फाटा येथे पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. औरंगाबत शहरात पोलिसांच्याच अंगावर गाडी घाल्याण्याचा प्रयत्न झाल्याने सामन्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

फिल्मी स्टाईलने पाठलाग :गाडी थांबण्याचा इशारा करुनही गाडी थांबत नसल्याने पोलिसांनी फिल्मी स्टाईलने गाडीचा पाठलाग सुरू केला. निपाणी फाटा जवळ असलेल्या पुलाखाली पोलिसांकडून बचावासाठी गोळीबार करण्यात आला. दोन राऊंड फायर केल्यावर गाडी थांबली. त्यानंतर त्या वाहनातून तिघे पळाले. त्यातील दोघांना पोलिसांनी शिताफीने पकडले. मात्र, एक जण फरार झाला. या घटनेनंतर औरंगाबाद ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती मिळते आहे. आरोपींनी गाडी का थांबली नाही, आरोपींनी पळ का काढला याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details