महाराष्ट्र

maharashtra

अमरावती : निम्न वर्धा प्रकल्पाचे तीन दरवाजे १० सेंटिमीटरने उघडले

By

Published : Jul 17, 2020, 3:54 PM IST

मागील तीन दिवसांपासून धरण क्षेत्रातील भागात चांगला दमदार पाऊस होत असल्याने धरणाच्या जलसाठ्यात मोठी वाढ होत आहे. त्यामुळे धरणाची पाणी पातळी ही २८२.७५ मी वर पोहचली असून निम्न वर्धा पाणी प्रकल्पाचे ३ दरवाचे हे १० सेंटिमीटरने उघडण्यात आले आहे. तर, यामधून १२ क्यूबिक पाण्याचा विसर्ग हा वर्धा नदीपात्रात सोडण्यात आला आहे.

निम्न वर्धा प्रकल्प
निम्न वर्धा प्रकल्प

अमरावती :येथील निम्न वर्धा प्रकल्पाचे तीन दरवाजे १० सेंटिमीटरने उघडले. सध्या अमरावती जिल्ह्यातील मागील तीन दिवसांपासून चांगला पाऊस होत असल्याने जिल्ह्यातील धनोडी निम्न वर्धा पाणी प्रकल्पाचे ३ दरवाचे हे १० सेंटिमीटर ने उघडण्यात आले आहे. तर, यामधून १२ क्यूबिक पाण्याचा विसर्ग हा वर्धा नदीपात्रात सोडण्यात आला असून नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून धरण क्षेत्रातील भागात चांगला दमदार पाऊस होत असल्याने धरणाच्या जलसाठ्यात मोठी वाढ होत आहे. त्यामुळे धरणाची पाणी पातळी ही २८२.७५ मी.वर पोहचली असून जलसाठा ७५% इतका आहे. त्याच पार्श्वभूमीवर ३३ दरवाजांपैकी तीन दरवांज्यामधून पाणी सोडण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज या धरणाचे तीन दरवाजे उघडून त्यातून आता पाण्याचा विसर्ग हा वर्धा नदीत सोडण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details