महाराष्ट्र

maharashtra

Amravati Violence : ग्रामीण भागातील परिस्थिती नियंत्रणात; पोलीस अधीक्षकांची माहिती

By

Published : Nov 14, 2021, 11:28 AM IST

ग्रामीण भागातील परिस्थिती नियंत्रणात राहावी याकरिता परतवाडा अचलपूर, मोर्शी परिसरात मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच ज्या लोकांमुळे परिस्थिती बिघडू शकते अशा लोकांचा शोध घेऊन त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात आले आहे. सद्या अमरावती जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात असून पोलिसांचे पथक मुख्य ठिकाणी तैनात असल्याची माहिती अमरावतीचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांनी दिली आहे.

पोलीस अधीक्षकांची माहिती
पोलीस अधीक्षकांची माहिती

अमरावती- त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ अमरावती शहरात हिंसाचार (Amravati Violence) झाला. भाजपा महिला जिल्ह्याध्यक्ष निवेदिता चौधरी (Nivedita chaudhari) यांनी ग्रामीण परिसर बंदच आवाहन केलं होतं. ग्रामीण भागातील परिस्थिती नियंत्रणात राहावी याकरिता परतवाडा अचलपूर, मोर्शी परिसरात मध्यरात्रीपासून संचारबंदी (Curfew) लागू करण्यात आली आहे. तसेच ज्या लोकांमुळे परिस्थिती बिघडू शकते अशा लोकांचा शोध घेऊन त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात आले आहे. सद्या अमरावती जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात असून पोलिसांचे पथक मुख्य ठिकाणी तैनात असल्याची माहिती अमरावतीचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगड (Superintendent of Police Avinash Bargad) यांनी दिली आहे.

ग्रामीण भागातील परिस्थिती नियंत्रणात

भाजपाच्या बंदला प्रतिसाद -

त्रिपुरातील हिंसाचाराच्या (Violence in Tripura) निषेधार्थ शुक्रवारी एका समुदायाने पुकारलेल्या बंद दरम्यान प्रचंड दगडफेक झाली होती. त्याच्या निषेधार्थ भाजपाने शनिवारी अमरावती बंदची हाक दिली होती. या बंद दरम्यान शहरातील राजकमल चौकातून निघालेल्या मोर्चेकऱ्यांनी दगडफेक करीत काही दुकानांना लक्ष्य केले. तोडफोड व जाळपोळही केली. त्यांना अटकाव करण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज व अश्रुधुराचा वापर केला. एवढेच नाही, तर येथील चांदणी चौक भागात दोन समुदायांचे गट आमने-सामने आले होते. तसेच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा हवेत गोळीबारही करावा लागला, त्यामुळे आज पुन्हा भाजप जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी ग्रामीण भागात बंदचे आवाहन करण्यात आले होते.

इंटरनेट सेवा बंद -

जिल्ह्यातील परतवाडा, अचलपूर व तिवसा येथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर अमरावती शहरात इंटरनेट सेवा बंद (Internet service off) करण्यात आली आहे. सकाळपासून अमरावतीच्या ग्रामीण भागात पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. अत्यावश्यक बाबी वगळता इतर दुकाने बंद आहे. तर प्रशासन परिस्थितीवर नियंत्रण ठेऊन आहेत. सोशल मीडियावर अपप्रचार करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर अचलपूर (Achalpur) येथे रस्त्यावर SRPF चे जवान दाखल झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details