महाराष्ट्र

maharashtra

अमरावती महापालिका कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी

By

Published : Aug 6, 2019, 10:16 AM IST

कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी गेल्या १७ जुलैला विशेष आमसभा घेण्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर या विषयावर संघटनेला चर्चेसाठी बोलावण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, प्रशासनाने यापैकी काहीच केले नाही.

अमरावती महापालिका कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी

अमरावती- महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी सोमवारी सकाळपासून बेमुदत संप पुकारला आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होतो. मात्र, कर्मचाऱ्यांना लागू केला जात नसल्याचा आरोप यावेळी कर्मचाऱ्यांनी केला.

अमरावती महापालिका कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी

महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी मुख्य प्रवेशद्वारसमोर एकत्र येत निदर्शने केली. महापालिकेच्या आस्थापनेवर असणाऱ्या अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळत आहे. सातव्या वेतन आयोगाची ४ महिन्यांची थकाबाकीही अधिकाऱ्यांनी घेतली आहे. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी गेल्या १७ जुलैला विशेष आमसभा घेण्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर या विषयावर संघटनेला चर्चेसाठी बोलावण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, प्रशासनाने यापैकी काहीच केले नाही. त्यामुळे कामबंद आंदोलन केले असल्याचे महापालिका कर्मचारी संघटनेचे प्रमुख प्रल्हाद कोतवाल यांनी दिली. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सोमवारी महापालिकेचे काम ठप्प पडले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details