महाराष्ट्र

maharashtra

Tushar Gandhi : वीर सावरकरांची ब्रिटीशांशी मैत्री होती, तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी माफी मागितली - तुषार गांधी

By

Published : Nov 18, 2022, 10:54 AM IST

Updated : Nov 18, 2022, 5:52 PM IST

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रातून जात आहे. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी (Mahatma Gandhi great grandson Tushar Gandhi) शुक्रवारी सकाळी महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील भारत जोडो यात्रेत राहुल गांधींसोबत सामील (Tushar Gandhi participated in Bharat Jodo Yatra) झाले.

तुषार गांधी यांचासुद्धा भारत जोडो यात्रेत सहभाग
तुषार गांधी

अकोला :वीर सावरकरांची ब्रिटीशांशी मैत्री होती. त्यामुळेच तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी माफी मागितली, अशी प्रतिक्रिया तुषार गांधी यांनी दिली आहे. राहुल गांधी यांच्यासोबत गांधीजींचे पणतू तुषार गांधी (Mahatma Gandhi great grandson Tushar Gandhi) यांचासुद्धा भारत जोडो यात्रेत सहभाग आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रातून जात (Tushar Gandhi participated in Bharat Jodo Yatra) आहे. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी शुक्रवारी सकाळी महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील भारत जोडो यात्रेत राहुल गांधींसोबत सामील झाले. काँग्रेसने त्यांचा सहभाग ऐतिहासिक असल्याचे गौरवले. 7 नोव्हेंबरपासून महाराष्ट्रातून जात असलेली ही यात्रा अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथून सकाळी 6 वाजता पुन्हा सुरू झाली आणि काही तासांनंतर शेगाव येथे पोहोचली.

राज्यकर्त्यांना संदेश :गुरुवारी केलेल्या ट्विटमध्ये तुषार गांधी यांनी शेगाव हे त्यांचे जन्मस्थान असल्याचे म्हटले होते. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले की, मी 18 तारखेला शेगाव येथील भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहे. शेगाव माझेही जन्मस्थान आहे. माझी आई ज्या ट्रेनमध्ये प्रवास करत होती. रेल्वे नागपूरमार्गे हावडा मेल शेगाव स्टेशनवर थांबली होती, जेव्हा माझा जन्म झाला होता. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. दोघे एकत्र चालणे हा राज्यकर्त्यांना संदेश आहे की, ते लोकशाही धोक्यात आणू शकतात. परंतु ते संपुष्टात येऊ दिले जाणार नाहीत, असे पक्षाने एका निवेदनात म्हटले आहे. तुषार गांधींशिवाय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक, दीपेंद्र हुडा, मिलिंद देवरा, माणिकराव ठाकरे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राहुल गांधींसोबत फिरले. राहुल गांधी आज संध्याकाळी शेगाव येथे जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यात असून 2 नोव्हेंबरला मध्य प्रदेशात दाखल होणार (Tushar Gandhi participated in Rahul Gandhi) आहे.

यात्रेचा तिसरा दिवस :कोल्यात 16 नोव्हेंबर रोजी दाखल झालेल्या यात्रेचा तिसरा दिवस होता. पहिल्या दिवशी राहुल गांधी यांची यात्रा पातूर येथून निघून ती बागफाटा येथे थांबली. रात्रीचा मुक्काम केल्यानंतर ही यात्रा पुन्हा याच ठिकाणावरून सुरू होऊन ती बागफाटा, बाळापूर मार्गे, बुलढाणा जिल्ह्यातील जवळा या गावात (Rahul Gandhi Bharat Jodo Yatra) पोहोचली.

तुषार गांधी सहभागी :दरम्यान, यात्रेमध्ये महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी हे सहभागी झाले. राहुल गांधी यांच्या हातात हात घालून हे दोघे जवळपास 5 ते 6 किलोमीटर चालले. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले त्यांच्यासोबत होते. त्यानंतर या यात्रेत काँग्रेसचे बडे नेते मुकुल वासनिक, आमदार भाई जगताप, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह आदी नेते या यात्रेत सहभाग घेतला. ही यात्रा सकाळी बुलढाणा जिल्ह्यातील जवळा या गावात पोहीचली. या यात्रेमध्ये नागरिकांचा मोठा उत्साह (Bharat Jodo Yatra) होता.

Last Updated : Nov 18, 2022, 5:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details