महाराष्ट्र

maharashtra

Look Back 2022 : सरत्या वर्षातील घटनांनी केले अकोलेकरांना अचंबित; वाचा मागोवा 2022

By

Published : Dec 23, 2022, 7:31 PM IST

अकोला जिल्ह्यासाठी 2022 हे वर्ष ( Look Back 2022 ) विकासासोबतच राजकीय आणि गुन्हेगारीसाठी उल्लेखनीय ठरले आहे. क्रीडा क्षेत्रात ( Shiv Sena MLA Nitin Deshmukh Left the Shinde Group ) अकोल्यामध्ये सरत्या वर्षात महत्वाच्या घडामोडी घडल्या ( Important Developments in Political at Akola ) आहेत. शेतकऱ्यांसाठीसुद्धा या वर्षात निराशाच मिळाली आहे. कला क्षेत्र, लोककला, साहित्य संमेलन, बालनाट्य स्पर्धेने या वर्षी सांस्कृतिक क्षेत्रात आपली छाप पाडली आहे. पाहूया अकोल्यामधील विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींवर मागोवा.

Look Back 2022 Events of Last Year Surprised Akolekar; Important Developments in Political, Social, Economic, Agricultural Sectors
सरत्या वर्षातील घटनांनी केले अकोलेकरांना अचंबित; पाहूया राजकीय, सामाजिक, आर्थिक, शेती क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी

अकोला : नवीन वर्षाची सुरुवात ( Look Back 2022 ) होत असताना, मागील वर्षात अकोला जिल्ह्यात विविध क्षेत्रात ( Akola Year Ender 2022 ) अनेक घडामोडी घडत होत्या. राज्यात सरत्या वर्षात सत्ता स्थापन ( Akola Year Ending 2022 ) करण्याच्या हालचाली सुरू असताना, अकोल्याचे आमदार नितीन देशमुख यांनी शिंदे गटाला सोडून ( NCP Youth Congress Shiva Mohod ) अकोल्यात परत ( Shiv Sena MLA Nitin Deshmukh Left the Shinde Group ) आले.

  1. अकोल्याचे आमदार नितीन देशमुखांचा प्रवास नितीन देशमुखांवर अनेक आरोप लागत असताना ( Important Developments in Political at Akola ) त्यांनीसुद्धा शिंदे गटावर आरोप केले. तर दुसरीकडे सेनेचे माजी आमदार गोपिकीशन बाजोरिया ( Former Sena MLA Gopikishan Bajoria ) आणि आमदार विप्लव बाजोरिया यांनी शिंदे गटात प्रवेश केला. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आमदार अमोल मिटकरी आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांचा वाद चांगलाच ( Left Arm Opening Batsman Atharva Taide ) गाजला. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळले होते.
    अकोल्याचे आमदार नितीन देशमुख
  2. 'भारत जोडो' यात्रेमुळे जिल्ह्यातील काँग्रेसला नवसंजीवनीखासदार संजय धोत्रे यांची प्रकृती स्थिर असताना आमदार गोवर्धन शर्मा यांचीसुद्धा प्रकृती बिघडली होती. तसेच, 'भारत जोडो' यात्रेमुळे जिल्ह्यातील काँग्रेसला नवसंजीवनी मिळाली आहे. वंचित बहुजन आघाडीने जिल्हा परिषदेवर पुन्हा अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये आपला झेंडा फडकविला. त्यासोबतच नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या व सरपंचपदाच्या निवडणुकीमध्ये सरपंचपद हे जास्तीत जास्त आपल्या वाटेवर आणल्याचा प्रकार वंचित बहुजन आघाडीने केला आहे.
    सरत्या वर्षातील घटनांनी केले अकोलेकरांना अचंबित; पाहूया राजकीय, सामाजिक, आर्थिक, शेती क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी
  3. दोन अल्पवयीन मुलींना दारू पाजून त्यांच्यावर अत्याचारस्थानिक गुन्हे शाखेने शेगाव येथून पकडलेल्या एका सराफा व्यापाराला कोठडीत असताना त्याच्याशी अश्लील वर्तवणूक केल्याप्रकरणी दोन पोलिस कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले. तर पोलिस अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात आली. या घटनेची शाही वाळत नाही तोच दोन अल्पवयीन मुलींना दारू पाजून त्यांच्यावर अत्याचार केले. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या घटना जिल्ह्याला नव्ह तर राज्यात चर्चेच्या ठरल्या.
    सरत्या वर्षातील घटनांनी केले अकोलेकरांना अचंबित; पाहूया राजकीय, सामाजिक, आर्थिक, शेती क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी
  4. शेतकऱ्यांना पावसाळ्यात भरपूर पाऊस पडल्याने पिकांचे नुकसानया वर्षी शेतकऱ्यांना पावसाळ्यात भरपूर पाऊस पडल्याने पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईची वाट पाहिली आहे. परंतु, तीसुद्धा अद्याप मिळालेली नाही. तर दुसरीकडे पीकविमा शेतकऱ्यांना मिळाला, तोही शंभर रुपयांच्या आतमध्ये असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जिल्ह्यात सर्वत्र आंदोलन केले होते. तर मूर्तिजापूर येथे विमा कंपनीचे कार्यालय उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकारी यांनी तिथे तोडफोड केली. तर रब्बी हंगामात वीज वितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना रात्री उशिरा पुरवठा करण्यात येत असल्याने शेतकरी पिकांना रात्री पाणी देत असल्याची परिस्थिती आहे.
    शेतकऱ्यांना पावसाळ्यात भरपूर पाऊस पडल्याने पिकांचे नुकसान
  5. स्थानिक क्रिकेट क्लब व विदर्भ क्रिकेट संघटनेचा मध्यमगती गोलंदाजस्थानिक क्रिकेट क्लब व विदर्भ क्रिकेट संघटनेचा मध्यमगती गोलंदाज व आक्रमक फलंदाज असा अष्टपैलू क्रिकेट खेळाडू दर्शन नळकांडे व सलामीला खेळणारा डावखुरा फलंदाज अथर्व तायडे यांना २०२३ मध्ये सुरु होणाऱ्या आय.पी.एल. स्पर्धेकरिता गुजरात टायटन व किंग्स इलेवन पंजाब संघाने आपल्या संघात कायम ठेवले आहे. त्यामुळे पुन्हा दर्शन व अर्थव आयपीएलमध्ये जलवा दिसणार आहे. तसेच क्रीडा प्रबोधणीच्या मुष्टियोद्ध्यांनी तर राष्ट्रीय स्तरावरील मुष्टि युद्ध स्पर्धेत पारितोषिक मिळवून अकोल्याचे नाव उंचावले आहे.
    स्थानिक क्रिकेट क्लब व विदर्भ क्रिकेट संघटनेचा मध्यमगती गोलंदाज
  6. ग्रामीण संस्कृतीची खरी ओळख म्हणजे लोककलाती लोककला टिकली पाहिजे, ती लोककला जपली पाहिजे. या उद्देशाने वऱ्हाड शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक संस्था लोणी, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई व श्री शिवाजी कला महाविद्याया तर्फे अकोला येथे तिसरे वऱ्हाड लोककला साहित्य संमेलन अतिशय थाटात संपन्न झाले. तर बाल नाटय संमेलन ही घेण्यात आले. या संमेलनात जिल्ह्यातील नव्हे तर इतरही जिल्ह्यातील बाल नाट्य सहभागी झाले होते. तसेच विदर्भ साहित्य संघाचे संमेलन ही अकोल्यात झाले.
    ग्रामीण संस्कृतीची खरी ओळख म्हणजे लोककला
  7. गांधीग्राम येथील इंग्रजकालीन उड्डाणपूल तडकल्याने त्यावरील वाहतूक बंदगांधीग्राम येथील इंग्रजकालीन उड्डाणपूल तडकल्याने त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाने यासंदर्भात अहवाल सादर केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतला. दरम्यान यासंदर्भात गोपालखेड येथील ग्रामस्थांनी अकोला अकोट वाहतूक सुरळीत करण्यासाठी कच्च्या रस्ता तयार केला. मात्र, उड्डाणपूल लवकरात लवकर दुरुस्त करून अकोला अकोट मार्ग सुरळीत करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. एकीकडे इंग्रजकालीन पूल आता खराब झाला असला तरी सहा महिण्याआधी शहरात बनविण्यात आलेला उड्डाणपूल अवघ्या सहा महिन्यांत खराब झाला. पुलाखाली पाईपलाईन फुटल्याने हा पूल खचत असल्याने येथील वाहतूक बंद करून दुरुस्ती कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
    गांधीग्राम येथील इंग्रजकालीन उड्डाणपूल तडकल्याने त्यावरील वाहतूक बंद
  8. अकोला अकोट रेल्वे मार्ग सुरू करण्याची मागणी अनेक वर्षांपासून या मागणीला यावर्षी यश आल्याने अकोला ते अकोट आणि अकोट ते अकोला ही रेल्वे वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे अकोला अकोट येजा करण्यासाठी प्रवाशांना अधिक सुकर झाले आहे. त्यासोबतच इतर ही वाहतूक व्यवस्था सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहे. अमरावती ते बुलढाणा राष्ट्रीय महामार्ग हा गेल्या अनेक वर्षांपासून रुंदीकरनाचे काम सुरू होते. या कामाला आता गती आली असून हे कामही लवकरच पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
    गांधीग्राम येथील इंग्रजकालीन उड्डाणपूल तडकल्याने त्यावरील वाहतूक बंद
  9. हिवरखेड ग्रामपंचायतला तालुक्याचा दर्जाहिवरखेड ग्रामपंचायतला तालुक्याचा दर्जा देण्यात आला होता. महाविकास आघाडी सरकार असताना हा निर्णय झाला. त्यावेळी येथील ग्रामस्थांनी 20 ते 25 वर्षांपासूनच्या मागणीला यश आले असल्याने ग्रामस्थांनी आनंद केला होता. परंतु, ज्यावेळी शिंदे गटाचे सरकार आले, त्यावेळी मात्र हा निर्णय फिरविल्या गेला. परिणामी येथील ग्रामस्थांनी रोष व्यक्त करीत आमदार प्रकाश भारसाकळे यांच्याविरोधात राग व्यक्त केला आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील असा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details