महाराष्ट्र

maharashtra

Shirdi Murder Case : शिर्डी हत्याकांड प्रकरण; जावायानं केलेल्या हल्ल्यातील घटनेत सासऱ्यानंही सोडला प्राण, मृतांची संख्या झाली चार

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 23, 2023, 7:20 AM IST

Shirdi Murder Case : शिर्डीजवळील सावळीविहीर इथं जावायानं केलेल्या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात इतर तीन जण जखमी होते. या जखमीतील सासरा चांगदेव गायकवाड यांचा शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या खून प्रकरणातील मृतांची संख्या आता चार झाली आहे.

Shirdi Murder Case
संपादित छायाचित्र

शिर्डी Shirdi Murder Case : कौटुंबीक वादातून जावायानं केलेल्या चाकू हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला होता. तर या घटनेत इतर तीन जणांवर साईबाबा रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र शुक्रवारी रात्री या घटनेतील सासऱ्याचाही मृत्यू ( Shirdi Murder Case ) झाल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. चांगदेव द्रुपद गायकवाड असं मृत्यू झालेल्या सासऱ्याचं नाव आहे. सुरेश निकम या जावायानं बुधवारी रात्री पत्नी, मेव्हणा, आजी सासू, आणि इतर तीन जणांवर चाकू हल्ला केला होता.

मृत चांगदेव गायकवाड

चांगदेव गायकवाड यांनी सोडला प्राण :सावळीविहीर इथं कौटुंबीक वादातून जावाई सुरेश निकम यानं चाकू हल्ला केला होता. या घटनेत सुरेश निकमची पत्नी वर्षा निकम, मेव्हणा रोहित गायकवाड व आजी सासू हिराबाई गायकवाड या तीन जणांचा मृत्यू झाला होता. तर चांगदेव गायकवाड त्यांची पत्नी आणि मुलगी योगिता जाधव यांच्यावर शिर्डीतील साईबाबा रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र शुक्रवारी रात्री जखमी चांगदेव गायकवाड यांनी प्राण सोडला आहे. त्यामुळे या घटनेतील मृतांची संख्या आता चार झाली आहे.

मृत वर्षा निकम

काय आहे खून प्रकरण :सावळीविहीर इथल्या चांगदेव गायकवाड यांच्या वर्षा या मुलीचा विवाह सुरेश निकम याच्यासोबत झाला होता. मात्र सुरेश निकमचे कुटुंब वर्षाचा छळ करत असल्याचा आरोप वर्षाच्या कुटुंबीयांनी केला. त्यामुळे वर्षा निकम माहेरी सावळीविहीर इथंच राहत होती. सुरेश निकम पत्नीला नांदवायला पाठवा म्हणून सासरच्याकडं तगादा लावत होता. मात्र वर्षाला पाठवण्यात आलं नसल्यानं सुरेश निकमनं बुधवारी रात्री सावळीविहीर गाव गाठलं. यावेळी त्यानं आजी सासू हिराबाई गायकवाड, पत्नी वर्षा निकम, मेव्हणा रोहित गायकवाड, सासरे चांगदेव गायकवाड, साली योगिता जाधव आणि सासूवर चाकूनं हल्ला केला होता. या घटनेत आजी सासू हिराबाई गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर वर्षा निकम आणि रोहित गायकवाड यांचा साईबाबा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री चांगदेव गायकवाड यांचाही मृत्यू झाल्यानं मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मृत रोहित गायकवाड

हेही वाचा :

मृत हिराबाई गायकवाड
  1. Shirdi Triple Murder : तिहेरी हत्याकांडानं शिर्डी हादरलं; जावयाकडून मेव्हण्यासह पत्नी, आजी सासूची हत्या
  2. शिर्डीत दुहेरी हत्याकांड; शेतकरी कुटुंबातील पती-पत्नीची निर्घृण हत्या

ABOUT THE AUTHOR

...view details