महाराष्ट्र

maharashtra

विखे पाटलांचा आमदार आशुतोष काळे यांना अप्रत्यक्षपणे पाठिंबा

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 6, 2023, 6:46 PM IST

Radhakrishna Vikhe Patil : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांना राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाठबळ दिलं आहे. त्यामुळं आगामी निवडणुकात भाजपाचे विकेक कोल्हे यांना उमेदवारी मिळणार की, आशुतोष काळे यांना मिळणार याकडं सर्वांच लक्ष लागलं आहे.

Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil

विखे पाटील यांचे भाषण

कोपरगाव :राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांच्या कोपरगाव मतदारसंघातील विविध विकासकामांचा शुभारंभ महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. मात्र, नागरिकांना कोपरगाव मतदारसंघात काळे विरुद्ध कोल्हे असा पारंपरिक राजकीय सामना नेहमीच पहायला मिळतोय. एकाच पक्षात असूनही विखे, कोल्हे यांच्यात सध्या कुरघोडीचं राजकारण सुरू आहे.

विखेंचे काळेंना पाठबळ : विवेक कोल्हे यांनी बाळासाहेब थोरात यांच्याशी मैत्री करत विखेंच्या बालेकिल्ल्यात तीन ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवलं होतं. त्यामुळं आता विखे पाटलांनीही कोल्हे यांचे विरोधक अससेले काळे यांना पाठबळ देण्यास सुरवात केली आहे. विखेंच्या प्रयत्नातून शिर्डी-कोपरगावसाठी मंजूर झालेल्या एमआयडीसीचं श्रेय कोल्हे घेण्याचा प्रयत्न करतायेत. त्यामुळं आज विखे यांनी नाव न घेता कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरातांवर नाव न घेता जोरदार टीका केलीय.

कोल्ह्यांना डिवचण्याचा प्रयत्न :कोपरगाव तालुक्यात एका कार्यक्रमासाठी काळे, विखे एकत्र आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. विखे पाटील भाजपाविरुद्ध आशुतोष काळे यांना बळ देण्याच्या चर्चा सगळीकडं रंगल्या आहेत. आमदार आशुतोष काळे यांनी विखे पाटील माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचं म्हटलं आहे. तसंच विखे आमच्या सोबत असल्यामुळं आम्हाला कोणतीही अडचण येणार नाही, असं विधान करून त्यांनी भाजपाच्या विवेक कोल्ह्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. खोटे बोला पण रेटून बोला अशी काहींची परंपरा असल्याची टीका त्यांनी कोल्हेंवर केली आहे. भाजपा, राष्ट्रवादीचा अजित पवार गटही सत्तेत सहभागी झाल्यानं राज्यातील राजकीय समीकरण बदललं आहे. कोपरगावमध्येही विधानसभेची उमेदवारी कोणाला मिळणार यावरून भाजपाचे विवेक कोल्हे तसंच राष्ट्रवादीचे आशुतोष काळे यांच्यात वाद सुरू आहेत.

हेही वाचा -

  1. ओबीसी मराठा आरक्षण वाद ; तर मराठा शिल्लक राहणार नाही, छगन भुजबळ यांचा पुन्हा हल्लाबोल
  2. बाबासाहेब आंबेडकरांच्या इंदू मिलच्या स्मारकाबाबत फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
  3. आरोग्य विभागाला भ्रष्टाचाराचा 'आजार'; अधिवेशनात सरकारला धारेवर धरणार, विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल

ABOUT THE AUTHOR

...view details