महाराष्ट्र

maharashtra

Leopard in Cage : नगरमध्ये नागरीवस्तीत घुसलेला बिबट्या अखेर जेरबंद, तीन तासांच्या प्रयत्नांनंतर वनविभागाला यश

By

Published : Dec 5, 2021, 5:27 PM IST

Updated : Dec 5, 2021, 5:37 PM IST

leopard in cage
leopard in cage ()

श्रीरामपुर शहरातील मोरगे वस्ती परिसरात सदावर्ते हॉस्पिटल रोडवरील नागरी वस्तीत घुसलेल्या बिबट्याने वन रक्षकासह सात जणांना जखमी केले. (leopard attack in Ahmednagar ) त्यानंतर तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर या बिबट्याला जेरबंद करण्यात ( Leopard in Cage) वन विभागाला यश आले आहे.

शिर्डी (अहमदनगर) - श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्तीत सकाळी बिबट्या घुसला आणि एकच गोंधळ उडाला. त्यानंतर बिबट्याला पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली. या दरम्यान बिबट्याने नागरिकांवर हल्ला करण्यास (leopard attack in Ahmednagar ) सुरवात केली. यात एका 11 वर्षीच्या मुलीसह एकूण सात नागरिक जखमी झाले आहेत. त्यात एका वन रक्षकांचाही समावेश आहे. मोरगे वस्तीत अनेक गल्ल्या एकमेकांना खेटून असल्याने बिबट्या परिसरात सैरावैरा पळत होता. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्मीण झाले होत. या परिसरात असलेल्या क्लासला आलेल्या एका 11 वर्षीय मुलीवरही बिबट्याने हल्ला केला. त्यानंतर तो लपण्यासाठी जागा शोधत असताना परिसरातील आणखी पाच जणांवर बिबट्याने हल्ला केला. ( Leopard in Cage) बिबट्याने हल्ला करतानाचा थरार अनेकांनी पाहिला. तर अनेक जण तो मोबाईलमध्ये कैद करण्यास धडपडत होते.

नगरमध्ये नागरीवस्तीत घुसलेला बिबट्या अखेर जेरबंद
श्रीरामपुरात बिबट्या घुसल्याने मोठी चर्चा सुरु झाली. त्यानंतर पोलीस आणि वनविभागाला याची माहीती देण्यात आले वन विभागच पथक संगमनेरहुन श्रीरामपुरात दाखल झाले. तो एका घराच्या बाथरुममध्ये जावुन लपला होता वन विभाच्या रॅपीड एक्शन टिमने त्या बिबट्यास बेशुध्द करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळीही बिबट्याने पळण्याचा प्रयत्न करत असतांनाच वन विभागाने बेशुध्द करण्याच इंजेक्शन त्याच्या दिशेने दागले आणि तो बेशुध्द झाला. मात्र यावेळी एक वन रक्षकावरही बिबट्याने हल्ला केल्याने तोही जखमी झाला आहे.बिबट्या शहरात आल्याची चर्चा सुरु झाल्याने कॉलनीतील आणि बाहेरील अनेकांनी बिबट्याला पहाण्यासाठी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे गोधळाची परिस्थीती निर्माण झाली आणि बिबट्या बिथरल्याने त्याने काहींना जखमी केले. त्यामुळे नागरीकांनी गोंधळ न घालता सुरक्षीत रहाणे गरजेच असल्याच दिसुन आले आहे.
Last Updated :Dec 5, 2021, 5:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details