Leopard Attack On People : श्रीरामपूर शहरात बिबट्याने केला पाच जणांवर हल्ला

author img

By

Published : Dec 5, 2021, 3:36 PM IST

Updated : Dec 5, 2021, 4:33 PM IST

घटनास्थळ

श्रीरामपूर ( Shrirampur) शहरातील मोरगे वस्ती परिसरातील सदावर्ते हॉस्पिटल रस्त्यावर आज (दि. 5) सकाळी बिबट्याने एका मुलीसह चार माणसांवर हल्ला ( Leopard Attack On People ) केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात जखमी झालेला पाच जणांना शहरातील साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अहमदनगर - श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्ती परिसरातील सदावर्ते हॉस्पिटल रस्त्यावर आज (दि. 5) सकाळी बिबट्याने एका मुलीसह चार माणसांवर हल्ला ( Leopard Attack On People ) केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात जखमी झालेला पाच जणांना शहरातील साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

श्रीरामपूर शहरात बिबट्याने केला पाच जणांवर हल्ला

श्रीरामपूर ( Shrirampur) शहरातील सदावर्ते हॉस्पिटल रस्त्यावर दाट लोक वस्ती आहे. या परिसरात आज (रविवार) सकाळी अचानक बिबट्या दिसला. त्यानंतर सगळे जण धावू लागले. बिबट्याने काही जणांवर हल्ला केला. हल्ल्यात लहान मुलीसह चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना शहरातील साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. गेल्या काही तासांपासून हा बिबट्या लोक वस्तीत फिरत असल्याने नागिरकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाचे अधिकाऱ्यांंसह पोलीस प्रशासन आता या बिबट्याचा शोध घेत आहेत.

हे ही वाचा - ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर साईसंस्थान सतर्क, विदेशातून येणाऱ्या भाविकांवर लक्ष

Last Updated :Dec 5, 2021, 4:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.