ETV Bharat / state

सातशेहून अधिक बेपत्ता नागरिकांचा उषा कोंडलकरांनी घेतला शोध - Nagpur City Police Usha Kondhalkar

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 2, 2024, 9:08 PM IST

Usha Kondhalkar searched missing citizens
उषा कोंडलकर (Reporter Dhananjay Tiple)

Usha Kondhalkar searched missing citizens : नागपूर शहरातील पोलीस कर्मचारी उषा कोंढाळकर यांनी सातशेहून अधिक बेपत्ता नागरिकांचा शोध घेतला आहे. त्यामुळं कित्येकांच्या कुटूंबाच्या चेहऱ्यावर हास्य फुललं आहे. उषा कोंडलकर यांच्या कार्याची दखल घेत नागपूर शहर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनी त्यांना बक्षीस दिलं आहे.

उषा कोंडलकर यांची प्रतिक्रिया (Reporter Dhananjay Tiple)

नागपूर Usha Kondhalkar searched missing citizens : नागपूरसारख्या महानगरातून रोज अनेक लोक हरवण्याच्या घटना घडताय. मात्र, पोलिसांमुळं अनेकांना त्यांचे नातेवाईक परत मिळतात देखील. कुटुंबातील सदस्य बेपत्ता झाल्यासं प्रत्येक सदस्यांच्या जीवाची घालमेल होते. नको-नको ते विचार त्यांच्या मनात येत असतात. अशावेळी त्या हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यास प्राथमिकता दिली जाते. या कामात पहिली मदत घेतली जाते ती म्हणजे पोलिसांची. नागपूर शहर पोलीस दलात गेल्या 33 वर्षांपासून कार्यरत असलेल्या पोलीस उषा कोंडलकर यांना हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात महारथ प्राप्त झाली आहे. त्यांनी आत्तापर्यंत 700 पेक्षा अधिक हरवलेल्या व्यक्तींना शोधून काढलं आहे. त्यांच्या या कार्याची दखल नागपूर शहर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनी घेतली असून त्यांना बक्षीस दिलंय.

700 हून अधिक नागरिकांचा शोध : उषा कोंडलकर या 1991 साली नागपूर पोलीस दलात रुजू झाल्या. तेव्हांपासून त्यांनी पोलीस विभागातील विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या आहे. मात्र, पूर्वी राणा प्रताप नगर तसंच एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असताना त्यांच्याकडं हरवलेल्या किव्हा घरातून निघून गेलेल्यांचा शोध घेण्याची जबाबदारी महत्वपूर्ण सोपविण्यात आली. उषा कोंडलकर यांनी ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठीचं जीवाचं रान करत आत्तापर्यंत 700 हून अधिक नागरिकांचा शोध घेतलाय.

आत्तापर्यंत शेकडोंना दाखवली घरची वाट : उषा कोंडलकर या सध्या एमआयडीसी पोलीस ठाण्यातील मिसिंग शोध पथकात कार्यरत आहे. त्यांनी 2021पासून आत्तापर्यंत 575 पैकी 536 मुले, महिला, पुरुषांचा शोध लावून कुटुंबाच्या स्वाधीन केले आहे. नागपूर शहरात ही व्यक्ती बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढलं आहे. कुटुंबातील एखदी व्यक्ती रागाच्या भरात निघून होती, तेव्हा त्या व्यक्तीला उषा कोंडलकर या तंत्रज्ञानाच्या मदतीनं शोधून काढतात.

तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास अशक्य काही नाही : बेपत्ता व्यक्तीचा शोध हा सुरू केला जातो, तेव्हा सर्वात आधी शोध पत्रिका ही प्रसिद्ध केली जाते. त्यानंतर तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज ही तपासले जातता, सोशल मीडियाची मदत घेतली जाते. बेपत्ता लोकांना शोधण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यातील, राज्यातील पोलीसांशी संपर्क केला जातो. या सर्व प्रयत्नांबरोबरचं तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून हरवलेल्या इसमाचा शोध घेतला जातो. तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास अशक्य काही नसल्याचं उषा कोंडलकर सांगतात.

अल्पवयीन पळून जाण्याची प्रमुख कारणे : अल्पवयीन मुली कोणत्या कारणानं घर सोडून पलायन करतात, याचा गंभीरपणे विचार केल्यास काही प्रमुख करण समोर आले आहेत. त्यामध्ये बाह्यजगाचे आकर्षण, प्रेमाची माहिती घरच्यांना कळणे, शिक्षणाची भीती, यासह पालकांकडून छळ, मुलांवर अभ्यास सक्ती, आई वडिलांकडून मुलांचा सतत द्वेष करणे, घरात सततचे होणारे वाद, चित्रपटाप्रमाणे रंगविलेले स्वप्न अशा प्रकरणात देखील अल्पवयीन घर सोडून जातात.

स्मार्टफोन, समाजमाध्यमे जबाबदार : अल्पवयीन मुला-मुलींच्या हातात स्मार्टफोन आले आहेत. त्या स्मार्टफोनचा वाढता उपयोग
अत्यंत धोकादायक ठरूतो आहे. मोबाईलसह टीव्ही, चित्रपटांमुळं समाजमाध्यमांमुळं अल्पवयीन मुला-मुलींमध्ये शारीरिक आकर्षण वाढत आहे. त्यालाच ते प्रेम समजू लागल्यानं पळून जाण्यासाठी प्रेरित होतात, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

शाळकरी मुली भावनेच्या भरात घर सोडतात : महत्त्वाचे म्हणजे शाळकरी मुलींना प्रेमाच्या जाळय़ात अडकवण्याचे प्रमाणही जास्त आहे. शाळेतील मुली भविष्याचा फारसा गांभीर्यानं विचार करीत नाही. केवळ भावनेच्या भरात मुली पळून जाण्यास तयार होतात.

हे वाचलंत का :

  1. 'तारक मेहता...' फेम अभिनेता गुरुचरण सिंग बेपत्ता, महत्त्वपूर्ण फुटेज पोलिसांच्या हाती - Gurucharan Singh Missing
  2. 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील 'रोशन सिंग सोढी बेपत्ता, जेनिफर बन्सीवालनं दिली प्रतिक्रिया... - Gurucharan Singh Missing
  3. पुण्यातील प्रणव कराड अमेरिकेतून बेपत्ता झाल्याचा कुटुंबीयांचा दावा; आई वडिलांची भावनिक साद - PRANAV KARAD Missing
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.