ETV Bharat / entertainment

ईशा मालवी आणि समर्थ जुरेल यांच्या ब्रेकअपवर अभिषेक कुमारनं दिली प्रतिक्रिया... - abhishek kumar reaction

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 20, 2024, 11:56 AM IST

Abhishek Kumar reaction: अभिषेक कुमार, ईशा मालवीय आणि समर्थ जुरेल हे 'बिग बॉस 17'मध्ये खूप चर्चेत होते. आता ईशा आणि समर्थ यांच्या ब्रेकअपवर अभिषेकनं प्रतिक्रिया दिली आहे.

Abhishek Kumar reaction
अभिषेक कुमारची प्रतिक्रिया (instagram)

मुंबई - Abhishek Kumar reaction : रिॲलिटी शो 'बिग बॉस 17' हा खूप हिट झाला होता. या शोमध्ये अभिषेक कुमार, ईशा मालवीय आणि समर्थ जुरेल यांच्यात खूप भांडणं होताना दिसली. अभिषेकला या शोमध्ये ईशा आणि समर्थनं खूप छळलं होतं. मात्र तरीही अभिषेक फिनालेपर्यत पोहचला. अभिषेक टॉप 2मध्ये आला. या शोनंतर तो रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी'मध्ये स्टंट करताना दिसला होता. आता त्याची फॅन फॉलोइंग खूप वाढली आहे. अभिषेकला नवीन प्रोजेक्ट मिळत आहेत. दरम्यान, ईशा आणि समर्थचे ब्रेकअप झाल्यानंतर अभिषेकनं याप्रकरणी एक विधान केलं आहे.

ईशा आणि समर्थचं ब्रेकअप : बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्यापूर्वीच ईशा आणि अभिषेकचं ब्रेकअप झालं होतं आणि त्याचं वेळी ती समर्थ जुरेलला डेट करत होती. बिग बॉसच्या घरात जेव्हा समर्थनं प्रवेश केला होता, यानंतर तो खूप नाराज झाला होता. त्यानं बिग बॉसच्या घरातच अभिषेक आणि ईशाचं ब्रेकअप होणार असल्याची भविष्यवाणी केली होती. दरम्यान एका मुलाखतीत अभिषेकनं ईशा आणि समर्थच्या ब्रेकअपवर प्रतिक्रिया देत म्हटलं, "मी ती क्लिप पुन्हा पाहिली आणि मला आश्चर्य वाटलं की मी इतके अचूक कसे बोललो. मला जाणवले की माणूस दुःखात खरं बोलत असतो. त्यावेळी मला मनातून खूप दुःख झालं होतं." यानंतर त्यानं पुढं म्हटलं, "दोघेही आनंदी राहोत." अभिषेकनं सांगितलं की, तो सध्या सिंगल आहे.

अभिषेक केली होती भविष्यवाणी : बिग बॉसच्या घरात मुनावर फारुकीशी बोलत असताना अभिषेकनं एकदा भाकित केलं होतं की, ईशा आणि समर्थचं ब्रेकअप होईल. त्यानं म्हटलं होत की, "ईशा बघेल समर्थ तिच्याप्रमाणे फेमस आहे की नाही, जर दोघेही समान असतील तर ठीक आहे पण तिनं जर समर्थाला मागे टाकलं तर ती त्याला सोडून जाईल. तिची आई त्यांना वेगळं करेल, मला माहित आहे की आमच्या ब्रेकअपमध्ये तिच्या आईचा मोठा हात आहे." अभिषेक कुमार हा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तो अनेकदा आपले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यांबरोबर शेअर करत असतो.

हेही वाचा :

  1. 'देवरा पार्ट 1' मेकर्सनं नवीन पोस्टर शेअर करून ज्युनियर एनटीआरला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Jr NTR Birthday
  2. जान्हवी, फरहान, राजकुमार रावसह बॉलिवूड सेलेब्रिटींनी मुंबईत केलं मतदान - Lok Sabha Election 2024
  3. वयाच्या 13 व्या वर्षी फोटो ॲडल्ट साइटवर झाले होते लीक...; जान्हवी कपूरनं केला धक्कादायक खुलासा - JANHVI KAPOOR SEXUALISED AT 13
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.