महाराष्ट्र

maharashtra

अहमदनगर : शहरात वाईनची दुकाने उघडताच मद्यपींची गर्दी; पोलिसांनी केली कारवाई

By

Published : Apr 21, 2021, 10:41 PM IST

कडक निर्बंध लागू असताना शासनाने वाईनच्या दुकानांना होम डिलिव्हरीची परवानगी राज्यात दिली आहे. याबाबत स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना परवानगीचे आदेश आहेत. अशीच परवानगी अहमदनगरचे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात जनता कर्फ्यू सुरू असताना दिली. मात्र, या आदेशाचा गैरवापर करत नगर शहरात आज सकाळी सात वाजल्यापासूनच अनेक वाईन दुकान चालकांनी थेट दुकानातूनच विक्री सुरू केली.

Wine shop huge crowd Ahmednagar
वाईन दुकान प्रचंड गर्दी अहमदनगर

अहमदनगर -कडक निर्बंध लागू असताना शासनाने वाईनच्या दुकानांना होम डिलिव्हरीची परवानगी राज्यात दिली आहे. याबाबत स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना परवानगीचे आदेश आहेत. अशीच परवानगी अहमदनगरचे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात जनता कर्फ्यू सुरू असताना दिली. मात्र, या आदेशाचा गैरवापर करत नगर शहरात आज सकाळी सात वाजल्यापासूनच अनेक वाईन दुकान चालकांनी थेट दुकानातूनच विक्री सुरू केली. शहरात मद्यपींपर्यंत ही माहिती पसरताच वाईन दुकानांसमोर प्रचंड गर्दी दिसून आली.

माहिती देताना सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण सुरसे

हेही वाचा -अहमदनगर : शहरात ऑक्सिजन दाखल होताच वितरणला सुरुवात

वाईन दुकान चालकांनी संधीचा फायदा उठवत वीस रुपये डिलिव्हरी चार्जेस लावत मद्य विक्री सुरू केली. अर्धवट शटर उघडून हव्या असलेल्या ब्रँडसह पाहिजे तेवढी मद्यविक्री सुरू केली. अनेक मद्यप्रेमींनी कडक निर्बंध लागेल या भीतीने दारूचे बॉक्स खरेदी केले. गंमतीचा भाग म्हणजे वाईनच्या दुकानातूनच वाईन मिळत असल्याची खबर पोलिसांअगोदर मद्यप्रेमींना मिळाली. त्यानंतर पोलिसांना याची माहिती यथावकाश मिळाल्यानंतर पोलीस अ‌ॅक्शन मोडमध्ये आले आणि त्यानंतर वाईन शॉपवर जात पोलिसांनी ग्राहकांना पिटाळून लावले, तर वाईन दुकान चालकांवर दंडात्मक कारवाई केली. चालकांना फक्त होम डिलिव्हरीची परवानगी असून नियम मोडल्यास यापुढे चालकांसह ग्राहकांवर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

उत्पादन शुल्क विभाग निद्रिस्त

नियमांचा गैरफायदा घेत वाईन शॉपमधून मद्य विक्री होत असताना अहमदनगरच्या उत्पादन शुल्कचे अधिकारी कुठेही कारवाई करताना दिसून आले नाही. ही जबाबदारी शेवटी पोलिसांना दंडात्मक कारवाई करून उरकावी लागली. शहरात अनेक बिअरबार हॉटेलमधून राजरोसपणे चढ्या दराने मद्य विक्री होत असताना किरकोळ कारवाई शिवाय ठोस कारवाई उत्पादन शुल्क विभागाकडून होताना दिसत नाही.

हेही वाचा -शिर्डी : साईबाबांच्या मंदिरात साध्‍या पध्‍दतीने श्रीराम जन्मोत्सव साजरा

ABOUT THE AUTHOR

...view details