महाराष्ट्र

maharashtra

'भाजपचे जातीय ध्रुवीकरण आणि जनतेच्या रेट्यातून महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात'

By

Published : Jan 20, 2020, 11:28 PM IST

सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुश्रीफ बोलत होते.

Hasan Mushrif
हसन मुश्रीफ

अहमदनगर- भारतीय जनता पक्ष जातीय ध्रुवीकरण करत आहे. त्यातूनच एक नाराजीचे वातावरण असून राज्यात महाविकास आघाडीचे आलेले सरकार त्याचाच भाग असल्याचे मत राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले आहे. भाजपाने उत्तर प्रदेशात एकाही मुस्लीम व्यक्तीला उमेदवारी दिली नाही. तसेच मागील भाजप सरकारमध्येही एकही मुस्लीम समाजाचा मंत्री नव्हता, असे त्यांनी सांगितले.

हसन मुश्रीफ, पालकमंत्री

सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुश्रीफ बोलत होते.

जनतेतून सरपंच निवड होणार बंद -

गेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राज्यामध्ये जनतेतून थेट ग्रामपंचायतीचा सरपंच निवडला गेला. आता महाविकास आघाडीने ठरवले आहे, सदस्यांमधून सरपंच निवड व्हावी. सरपंच पदासाठी थेट जनतेतून निवडणूक होणार नाही, यासाठी लवकरात लवकर अध्यादेश आणला जाणार आहे, असे मुश्रिफ यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details