महाराष्ट्र

maharashtra

कोरोना रुग्णवाढ थांबविण्यासाठी सर्वांनी कडक लॉकडाऊन पाळा - महसूल मंत्री थोरात

By

Published : Apr 18, 2021, 5:00 PM IST

कोरोनाची दुसरी लाट मोठी असून वाढणारी रुग्ण संख्या ही चिंताजनक आहे. त्यामुळे ही रुग्णवाढ थांबविण्यासाठी येत्या 30 एप्रिल पर्यंत प्रत्येकाने लॉग डाऊनचे निर्बंध अत्यंत कडक पद्धतीने पाळावे, असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

आढावा बैठक
आढावा बैठक

अहमदनगर - मागील वर्षी आलेले कोरोनाचे संकट रोखण्यासाठी ग्रामीण भागासह शहरात अत्यंत कडक पद्धतीने अंमलबजावणी केली होती. आता कोरोनाची दुसरी लाट मोठी असून वाढणारी रुग्ण संख्या ही चिंताजनक आहे. त्यामुळे ही रुग्णवाढ थांबविण्यासाठी येत्या 30 एप्रिल पर्यंत प्रत्येकाने लॉग डाऊनचे निर्बंध अत्यंत कडक पद्धतीने पाळावे, असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

संगमनेर येथील अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज येथे झालेल्या कोरोना उपाययोजनांबाबत च्या आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी आ.डॉ.सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, सभापती सुनंदा जोर्वेकर, डॉ. हर्षल तांबे, उपसभापती नवनाथ अरगडे, उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, तहसीलदार अमोल निकम, बीडीओ सुरेश शिंदे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, वैद्यकीय अधिक्षक डॉ.राजकुमार ज-हाड, वैद्यकीय अधिकारी संदिप कचोरीया, तालुका वैद्यकिय अधिकारी सुरेश घोलप, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घूगरकर, अमृतवाहिनी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, महेश वाव्हळ व आदि उपस्थित होते.

या बैठकीत बोलताना थोरात म्हणाले, की जगासह राज्यात कोरोनाची मोठी लाट आलेली आहे. पहिल्या लाटेमध्ये नागरिकांनी अत्यंत दक्षता घेतली. सध्या दुसर्‍या लाटेत वाढणारी कोरोना रुग्णसंख्या अत्यंत चिंताजनक आहे. ही रुग्णवाढ थांबविण्यासाठी 30 एप्रिल पर्यंत प्रत्येकाने अत्यंत कडक पद्धतीने लॉकडाऊन पाळला तर कोरोना रुग्ण कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. गावोगावी ग्राम दक्षता समित्या पुन्हा एकदा सक्रिय झाल्या पाहिजे, याच बरोबर नागरिकांनी कोणतेही आजाराचे लक्षणे आढळले तर तातडीने वैद्यकीय अधिकार्‍यांचा सल्ला घ्यावा. होम आयसोलेशन बंद असून लक्षणे आढळणारे रुग्णांचे संस्थात्मक विलगीकरणास प्राधान्य देण्याचे त्यांनी सांगितले.

गावोगावी तपासणी वर भर देताना नव्याने प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. रेमडेसिवीर औषधाच्या प्रोटोकॉल चे पालन सर्वत्र झाले पाहिजे. त्याचा दुरुपयोग होणार नाही याची काळजी घ्या. ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी आपन राज्य स्तरावरून प्रयत्न करत आहोत. आगामी पंधरा दिवस अत्यंत महत्त्वाचे असून प्रत्येकाने शासकीय नियमांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details