महाराष्ट्र

maharashtra

अहमदनगर येथे दूध उत्पादक शेतकर्‍यांचे दरवाढीसाठी आंदोलन

By

Published : Jun 17, 2021, 2:26 PM IST

लॉकडाऊनच्या काळात मागणी घटल्याचे कारण देत खाजगी व सहकारी दूध संघांनी दूध खरेदीचे दर दहा ते पंधरा रुपये प्रति लिटरने पाडले. यामुळे ग्राहकांसाठीचे विक्रीदर मात्र तसेच ठेवत शेतकरी व ग्राहकांची प्रचंड लूटमार केली आहे. या विरोधात आज (गुरूवार) दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आणि किसान सभेच्यावतीने आंदोलन छेडण्यात आले आहे.

agitation of milk producing farmers in Ahmednagar
अहमदनगर येथे दूध उत्पादक शेतकर्‍यांचे दरवाढीसाठी आंदोलन

अहमदनगर - लॉकडाऊनचा गैरफायदा घेत दूध उत्पादक शेतकऱ्यांची खाजगी व सहकारी दूध संघाकडून मोठी लूटमार करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात मागणी घटल्याचे कारण देत खाजगी व सहकारी दूध संघांनी दूध खरेदीचे दर दहा ते पंधरा रुपये प्रति लिटरने पाडले. यामुळे ग्राहकांसाठीचे विक्रीदर मात्र तसेच ठेवत शेतकरी व ग्राहकांची प्रचंड लूटमार केली आहे. या विरोधात आज (गुरूवार) दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आणि किसान सभेच्यावतीने आंदोलन छेडण्यात आले आहे. किसान सभेचे सम्नवयक अजीत नवले यांनी अकोले तालुक्यातील अबंड या गावात आंदोलनात सहभाग घेतला. शेतकऱ्यांनी दुधाने दगडाचा अभिषेक करत आणि सरकार विरोधी घोषणा देत आंदोलन केले आहे.

अहमदनगर येथे दूध उत्पादक शेतकर्‍यांचे दरवाढीसाठी आंदोलन

दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या 'या' आहेत प्रमुख मागण्या -

  1. लॉकडाऊनच्या काळात मागणी घटल्याचा बाऊ करत ज्या खाजगी व सहकारी दूध संघांनी दूध खरेदीचे दर पाडले, त्या सर्व दूध संघांचे ऑडिट करा, प्रत्यक्षात दुधाची मागणी किती घटली होती व त्याप्रमाणात किती दर कमी देण्यात आले याबाबत सखोल चौकशी करा व परिस्थितीचा गैरफायदा घेऊन शेतकऱ्यांची लूटमार करणाऱ्या खाजगी व सहकारी दूध संघांवर कठोर कारवाई करा, केलेली लूटमार वसूल करून ती शेतकऱ्यांना परत करा. लॉकडाऊनपूर्वी मिळत असलेला प्रति लिटर ३५ रुपये दर तातडीने सुरू करा.
  2. आगामी काळात दूध उत्पादकांची लूटमार करता येणार नाही यासाठी खाजगी व सहकारी दूध संघांना लागू होईल असा लूटमार विरोधी कायदा करा.
  3. साखर व्यवसायाप्रमाणे दूध व्यवसायाला किमान आधारभावासाठी एफ.आर.पी. व शिल्लक मिळकतीत हक्काच्या वाट्यासाठी रेव्हेन्यू शेअरींग असे कायदेशीर दुहेरी संरक्षण लागू करा.
  4. अनिष्ट ब्रँड वॉर रोखण्यासाठी एक राज्य एक ब्रँड धोरण स्वीकारा.
  5. दूध भेसळी बंद करा. टोंन्ड दुधावर बंदी आणा. भेसळ विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी करून ग्राहकांना शुद्ध दूध रास्त दरात उपलब्ध होईल याची कायदेशीर हमी द्या.

ABOUT THE AUTHOR

...view details