महाराष्ट्र

maharashtra

दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता नाणी साईचरणी नतमस्तक....

By

Published : Dec 2, 2022, 5:22 PM IST

दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता नाणी याने गुरुवारी आपल्या बहिणी बरोबर शिर्डीत येवून साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. दरम्यान नवीन वर्षात 30 मार्च रोजी नाणीचा दसरा नवीन चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा यशासाठी त्याने साईबाबांच्या चरणी प्रार्थना केलीय.

दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता नाणी साईचरणी नतमस्तक
दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता नाणी साईचरणी नतमस्तक

शिर्डी ( अहमदनगर )- दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता नाणी याने गुरुवारी आपल्या बहिणी बरोबर शिर्डीत येवून साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. दरम्यान नवीन वर्षात 30 मार्च रोजी नाणीचा दसरा नवीन चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा यशासाठी त्याने साईबाबांच्या चरणी प्रार्थना केलीय.

अभिनेता नाणी साईचरणी नतमस्तक

गुरुवारी साईबाबांच्या माध्यन्ह आरतीनंतर अभिनेता नाणी याने आपली बहिणी दिप्ती बरोबर शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. साईबाबांच्या दर्शनानंतर ई टीव्ही भारतशी बोलतांना नाणी म्हणाला की, अनेक दिवसांपासून शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी येण्याची यांची ईच्छा होती. मात्र मधील काळात कोरोना आणि चित्रपटाच्या शुटिंग सुरू असल्याने येता आले नाही. मात्र आज वेळ काढून माझी बहिणी दिप्ती बरोबर आज शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी आलो असल्याचं नाणी सांगितले आहे. साईबाबांच्या दर्शनाने मनाला समाधान मिळते. तसे मी साईबाबांना काहीच मागत नाही, साईबाबा मला न मागता देतात, असेही नाणीने सांगितले आहे. येणाऱ्या नवीन 2023 वर्षाच्या 30 मार्च रोजी माझा दसरा चित्रपट प्रदर्शित होणार असून नवीन वर्षात अनेक चित्रपट माझे येणार असल्याचं नाणी यावेळी सांगितले आहे.


दरम्यान, दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता नाणी आज शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी येत असल्याची बातमी वाऱ्या सारखी शिर्डीत पसरली आणि नाणीला पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. नाणी शिर्डीत आल्यानंतर शिर्डीतील काही तरुणांनी नाणीचे स्वागत केले. तसेच नाणीचा साईबाबांची शॉल आणि मूर्ती देवून सन्मान केला.

हेही वाचा -सर्कसच्या ट्रेलरमधून रणवीर सिंगचा हाय व्होल्टेज झटका, रोहित शेट्टीच्या धमाल मस्तीची नवी इनिंग

ABOUT THE AUTHOR

...view details