महाराष्ट्र

maharashtra

Wimbledon 2022 : इगा स्वियाटेकची विजयाची मालिका खंडीत; तब्बल 37 सामन्यांनंतर पत्करावा लागला पराभव

By

Published : Jul 3, 2022, 3:42 PM IST

महिला एकेरीच्या लढतीत फ्रेंच ओपन चॅम्पियन स्वियटेकचा फ्रान्सच्या 37व्या मानांकित खेळाडू कॉर्नेटने 6-4, 6-2 असा पराभव केला. स्वियटेकची अपराजित राहण्याची मालिका ( Iga Svitech winning streak breaks ) फेब्रुवारीपासून सुरू होती, त्यादरम्यान तिने सलग सहा स्पर्धा जिंकल्या आहेत.

Iga Svitech
Iga Svitech

विम्बल्डन: अव्वल मानांकित महिला टेनिसपटू इगा स्वियाटेकची ( Women tennis player Iga Sviatek ) 37 सामन्यांची विजयी मालिका शनिवारी विम्बल्डनच्या तिसऱ्या फेरीत एलिस कॉर्नेटकडून सरळ सेटमध्ये पराभूत झाल्यामुळे संपुष्टात आली. महिला एकेरीच्या लढतीत फ्रेंच ओपन चॅम्पियन स्विअटेकचा फ्रान्सच्या 37व्या मानांकित खेळाडू कॉर्नेटने 6-4, 6-2 असा पराभव केला.एक तास 33 मिनिटे चाललेल्या या सामन्यात स्वीयटेकने 33 चुका केल्या तर कॉर्नेटने अशा चुका केवळ सात वेळा केल्या. स्वियाटेकची अपराजित राहण्याची मालिका फेब्रुवारीपासून सुरू होती, त्यादरम्यान तिने सलग सहा स्पर्धा जिंकल्या.

ऑल इंग्लंड क्लबमध्ये ( All England Club ) कॉर्नेटचा हा पहिला आश्चर्यकारक निकाल नाही. तिने 2014 मध्ये या ग्रास-कोर्ट ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या चौथ्या फेरीत सेरेना विल्यम्सचा पराभव केला होता. तिसर्‍या फेरीत क्रोएशियाच्या पेट्रा मार्टिककडून पराभूत झाल्याने यंदाच्या ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्याची जेसिका पेगुलाची मालिका संपुष्टात आली आहे. मार्टिकने 28 वर्षीय अमेरिकेच्या आठव्या मानांकित खेळाडूचा 6-2, 7-6 असा पराभव केला.

पेगुलाने यंदा ऑस्ट्रेलियन ओपन आणि फ्रेंच ओपनची उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. तिने पहिल्यांदाच विम्बल्डनच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. रँकिंगमध्ये 80व्या क्रमांकावर असलेल्या मार्टिकने यापूर्वी दोनदा विम्बल्डनची चौथी फेरी गाठली आहे. उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवण्यासाठी तिची पुढील लढत 17व्या मानांकित एलेना रायबाकिनाशी होईल. ऑल इंग्लंड क्लबमध्ये सातवेळा चॅम्पियन सेरेना विल्यम्सचा पराभव करणाऱ्या हार्मनी टॅननेही चौथ्या फेरीत प्रवेश केला. टॅनने स्थानिक खेळाडू कॅटी बोल्टरचा 6-1, 6-1 असा पराभव केला.

बिगरमानांकित फ्रेंच खेळाडू ऑल इंग्लंड क्लबमध्ये पदार्पण करत आहे जिथे तिचा पुढचा सामना अमांडा अनिसिमोवाशी होईल. अमांडाने फ्रेंच ओपन उपविजेत्या कोको गॉफचा पराभव केला. अमेरिकेच्या दोन युवा खेळाडूंमधील सामना अमांडाने 6-7, 6-2, 6-1 असा जिंकला. ऑस्ट्रेलियाच्या आयला तोमियानवीने 2021 फ्रेंच ओपन चॅम्पियन बार्बोरा क्रेज्सिकोवाचा प्रवास 2-6, 6-4, 6-3 असा संपवला.

हेही वाचा -Maharashtra Kusti Parishad : बाळासाहेब लांडगे आणि मुलाने कुस्तीगीर परिषदेत भ्रष्टाचार केला; संदीप भोंडवेंचा आरोप

ABOUT THE AUTHOR

...view details