महाराष्ट्र

maharashtra

बॉक्सिंगपटू मेरी कोम आणि लवलिना यांनी घेतली लस

By

Published : May 12, 2021, 5:41 PM IST

भारताची स्टार महिला बॉक्सिंगपटू मेरी कोम आणि लवलिना बोरगोहेन यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला.

olympic-bound-boxers-mary-kom-and-lovlina-borgohain-get-first-jab-of-covid-19-vaccine
बॉक्सिंगपटू मेरी कोम आणि लवलिना यांनी घेतली लस

पुणे - भारताची स्टार महिला बॉक्सिंगपटू मेरी कोम आणि लवलिना बोरगोहेन यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. पुणे येथील कमांड रुग्णालयात त्यांनी लसीचा पहिला डोस घेतला.

मेरी कोम आणि लवलिनासह भारताचे एकूण १० बॉक्सिंगपटू पुण्याच्या आर्मी स्पोर्ट्स इन्सिट्यूटमध्ये आयोजित राष्ट्रीय शिबिरात सहभागी झाले आहेत. यादरम्यान, मेरी कोम आणि लवलिना या दोघांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला.

मेरी कोम आणि लवलिना यांच्यासह कोचिंग आणि सहकारी स्टाफमधील चार जणांनी देखील लस टोचून घेतली.

या क्रिकेटपटूंनी घेतली लस -

आतापर्यंत शिखर धवन, विराट कोहली, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, दीपक चहर, सिद्धार्थ कौल, दिनेश कार्तिक आणि महिला क्रिकेट स्मृती मानधाना यांनी लस टोचून घेतली आहे.

हेही वाचा -सुरेश रैनानंतर हरभजनच्या मदतीला धावला सोनू सूद

हेही वाचा -'भावा पँट तरी घालायची', ख्रिस लीन आणि दिनेश कार्तिकमध्ये रंगला मजेशीर कलगीतुरा

ABOUT THE AUTHOR

...view details