महाराष्ट्र

maharashtra

Narinder Batra Resigned : नरिंदर बत्रा यांनी FIH अध्यक्षपदाचा दिला राजीनामा, अन् आयओसीचे सदस्यत्वही सोडले

By

Published : Jul 18, 2022, 3:24 PM IST

नरिंदर बत्रा यांनी तीन स्वतंत्र अधिकृत पत्रे लिहून आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला ( Batra resigns as FIH President ) आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने 25 मे रोजी दिलेल्या निकालात हॉकी इंडियाचे आजीवन सदस्यत्व ( Quits IOC Membership ) रद्द केले.

Narinder Batra
नरिंदर बत्रा

नवी दिल्ली:ज्येष्ठ क्रीडा प्रशासक नरिंदर बत्रा यांनी सोमवारी आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या (FIH) अध्यक्षपदाचा राजीनामा ( Narinder Batra resigned as President FIH ) दिला. त्याचबरोबर त्यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (IOC) सदस्यत्वही सोडले ( left membership of IOC ). दिल्ली उच्च न्यायालयाने 25 मे रोजी हॉकी इंडियामधील 'आजीवन सदस्य' पद रद्द केल्यानंतर बत्रा यांना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेचे (IOA) अध्यक्षपद सोडावे लागले.

बत्रा ( Senior sports administrator Narinder Batra ) यांनी हॉकी इंडियाचे आजीवन सदस्य म्हणून 2017 मध्ये आयओए निवडणूक लढवली आणि जिंकली होती. तीन स्वतंत्र पत्रांद्वारे, बत्रा यांनी अधिकृतपणे IOA, IOC आणि FIH मधील त्यांच्या पदांचा राजीनामा दिला. बत्रा यांनी एआयएच कार्यकारी मंडळाला लिहिले की, "वैयक्तिक कारणांमुळे मी एफआयएचच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे." बत्रा यांचे आयओसी सदस्यत्व त्यांच्या आयओए अध्यक्षपदाशी जोडले गेले होते.

परंतु त्यांनी FIH मधून राजीनामा दिल्याने आश्चर्यचकित झाले. कारण त्यांनी मे महिन्यात सांगितले की त्यांना आता जागतिक हॉकी संस्थेतील त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करायचे आहे.

हेही वाचा -ICC ODI Rankings : आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत भारतीय संघ तिसऱ्या स्थानी विराजमान

ABOUT THE AUTHOR

...view details