महाराष्ट्र

maharashtra

PV Sindhu Ranking : पी.व्ही. सिंधू टॉप 10 मधून बाहेर, सायनाची 31 व्या स्थानी घसरण

By

Published : Mar 29, 2023, 10:12 AM IST

ताज्या जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत भारतीय खेळाडूंना मोठा फटका बसला आहे. पी. व्ही. सिंधू सहा वर्षांत प्रथमच अव्वल 10 खेळाडूंमधून बाहेर फेकल्या गेली आहे. तर दुसरीकडे पुरुषांच्या एकेरी क्रमवारीत किदाम्बी श्रीकांतची 21 व्या स्थानावर घसरण झाली आहे.

PV Sindhu
PV Sindhu

नवी दिल्ली :ऑलिम्पिक स्पर्धेत दोन वेळा पदक जिंकणाऱ्या पी. व्ही. सिंधूच्या जागतिक क्रमवारीत घसरण झाली आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या जागतिक महिला बॅडमिंटन क्रमवारीत सिंधू पहिल्या 10 मधून बाहेर पडली आहे. भारताची ही स्टार खेळाडू गेल्या सहा वर्षांहून अधिक काळ जगातील पहिल्या दहा खेळाडूंमध्ये होती. 27 वर्षीय सिंधूला गेल्या आठवड्यात स्विस ओपनमध्ये महिला एकेरीत पराभव पत्करावा लागला होता. या पराभवाचा तिच्या क्रमवारीवर मोठा परिणाम झाला आहे.

सायना नेहवालचीही घसरण :पी. व्ही. सिंधू दोन स्थानांनी घसरून 60448 गुणांसह 11 व्या स्थानावर आली आहे. माजी विश्वविजेती असेलल्या सिंधूने एकेकाळी जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानापर्यंत झेप घेतली होती. नोव्हेंबर 2016 पासून ती जागतिक क्रमवारीत सतत पहिल्या 10 खेळाडूंमध्ये राहिली आहे. ऑगस्ट 2013 मध्ये सिंधू प्रथमच जगातील टॉप 10 खेळाडूंमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी झाली होती. नव्या क्रमवारीत दिग्गज खेळाडू सायना नेहवाललाही मोठा फटका बसला आहे. ती 36600 गुणांसह 31 व्या क्रमांकावर घसरली आहे. महिलांच्या मिश्र श्रेणीमध्ये त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद 43501 गुणांसह 18 व्या क्रमांकावर आहेत.

पुरुषांची क्रमवारी : पुरुषांच्या एकेरी क्रमवारीत एच. एस. प्रणॉय 9 व्या क्रमांकावर आहे. त्याच्या क्रमवारीत कोणताही बदल झालेला नाही. त्याचे 64347 गुण आहेत. मात्र दुसरीकडे स्टार खेळाडू किदाम्बी श्रीकांतची 48701 गुणांसह 21 व्या स्थानावर घसरण झाली आहे. ताज्या क्रमवारीत लक्ष्य सेनचेही नुकसान झाले आहे. तो 46364 गुणांसह 25 व्या स्थानावर पोहोचला आहे. पुरुष दुहेरीत स्विस ओपन चॅम्पियन सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी 68246 गुणांसह क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर आहेत. तर एम. आर. अर्जुन आणि ध्रुव कपिला ही जोडी 40238 गुणांसह 26 व्या स्थानावर आहे.

हे ही वाचा :IPL Star Sports Launch Subtitles Feed : स्टार स्पोर्ट्स 'सबटायटल फीड' करणार लाँच, चाहत्यांच्या गरजेनुसार असतील फीचर्स

ABOUT THE AUTHOR

...view details