महाराष्ट्र

maharashtra

महिला हॉकी : शेवटच्या मिनिटात गुरजीतने केलेल्या गोलमुळे भारताचा ग्रेट ब्रिटनवर विजय

By

Published : Sep 28, 2019, 8:22 PM IST

Updated : Sep 29, 2019, 9:47 PM IST

सामना संपण्यासाठी अवघे ४८ सेंकद होते, तेव्हा भारताला शॉट कार्नर मिळाला आणि याचा फायदा गुरजीतने उचलला. तिने ही संधी गोलच्या रुपात बदलून भारताला २-१ ने विजय मिळवून दिला. दरम्यान, मालिकेतील दुसरा सामना रविवारी खेळवण्यात येणार आहे.

महिला हॉकी : शेवटच्या मिनिटात गुरजीतने केलेल्या गोलमुळे भारताचा इंग्लंडवर विजय

नवी दिल्ली - भारतीय महिला हॉकी संघाने इंग्लंड दौऱ्यात विजयी सुरूवात केली आहे. पहिल्या सामन्यात गुरजीत कौरने शेवटच्या मिनिटात गोल करुन संघाला विजय मिळवून दिला. भारतीय महिला संघाने ग्रेट ब्रिटन संघावर २-१ ने पराभव करत ५ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली आहे.

भारतीय महिलांनी यजमान संघाविरुध्द शानदार खेळ केला. दुसऱ्या हाफमध्ये भारतीय संघ १-० अशा पिछा़डीवर होता. तेव्हा शर्मिला देवी आणि गुरजीतने प्रत्येकी एक गोल करत संघाला विजय मिळवून दिला.

पहिला हाफ बरोबरीत सुटला. मात्र, दुसऱ्या हाफमध्ये यजमान संघाची खेळाडू एमिला हिने ४६ व्या मिनिटाला गोल करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. तेव्हा शर्मिला देवीने गोल करत सामना १-१ ने बरोबरीत आणला.

सामना संपण्यासाठी अवघे ४८ सेंकद होते, तेव्हा भारताला शॉट कार्नर मिळाला आणि याचा फायदा गुरजीतने उचलला. तिने ही संधी गोलच्या रुपात बदलून भारताला २-१ ने विजय मिळवून दिला. दरम्यान, मालिकेतील दुसरा सामना रविवारी खेळवण्यात येणार आहे.

हेही वाचा -हॉकी : भारतीय संघाने उडवला विश्वविजेता बेल्जियमचा २-० धुव्वा

हेही वाचा -महिला हॉकी : इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी राणी रामपालकडे टीम इंडियाचे कर्णधारपद

Intro:Body:

sports marathi


Conclusion:
Last Updated :Sep 29, 2019, 9:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details