ETV Bharat / sports

हॉकी : भारतीय संघाने उडवला विश्वविजेता बेल्जियमचा २-० धुव्वा

author img

By

Published : Sep 26, 2019, 9:52 PM IST

भारतीय संघाने बेल्जियमचा २-० ने धुव्वा उडवत पाच सामन्याच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान, या सामन्यात मनदीप आणि आकाशदीप यांनी प्रत्येकी एक गोल केला.

हॉकी : भारतीय संघाने उडवला विश्वविजेता बेल्जियमचा २-० धुव्वा

एंटवर्प ( बेल्जिअम ) - मनदीप सिंग आणि आकाशदीप सिंग यांनी केलेल्या दमदार कामगिरीमुळे भारतीय हॉकी संघाने विश्वविजेता आणि जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या बेल्जियमचा पराभव केला. भारतीय संघाने बेल्जियमचा २-० ने धुव्वा उडवत पाच सामन्याच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान, या सामन्यात मनदीप आणि आकाशदीप यांनी प्रत्येकी एक गोल केला.

भारतीय संघाने पहिल्या हाफमध्ये यजमान संघावर दडपण निर्माण करत पहिली पेनाल्टी मिळवली. मात्र, बेल्जियमचा गोलरक्षक लोईक वॉन डोरेन याने चांगला बचाव केला. यानंतर यजमान संघाने आक्रमण करत पेनाल्टी मिळवली. तेव्हा कृष्ण पाठक याने बचाव करत आघाडी मिळू दिली नाही. नंतर भारतीय संघाने विरोधी संघाच्या गोलपोस्टवर जोरदार आक्रमण करत सलग दोन पेनाल्टी मिळवले. मात्र, या दोनही पेनाल्टीवर भारतीय संघाने गोल करता आला नाही. पहिला हाफ ०-० ने बरोबरीत राहिला.

हेही वाचा - 'तिरंग्या'ची शान वाढवणाऱ्या महिलांचा सन्मान, 'पद्म'साठी ९ महिला खेळाडूंची शिफारस

दुसऱ्या हाफमध्ये भारतीय संघाने आक्रमण धारधार केला आणि ३९ व्या मिनिटाला मनदीप सिंगने पहिला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. भारतीय संघाने आघाडी घेतल्याने, यजमान बेल्जियमचा संघानेही आक्रमक खेळ सुरू केला. मात्र, भारतीय बचावपटूंनी त्यांचे आक्रमण परतवून लावले. सामन्याच्या ५४ व्या मिनिटाला आकाशदीप सिंग याने आणखी एक गोल करत भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर बेल्जियम संघाच्या आशा संपूष्टात आल्या.

हेही वाचा - आगामी बेल्जियम दौऱ्यासाठी हॉकी टीमची घोषणा, मनप्रीत करणार नेतृत्व

Intro:Body:

Sports


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.