महाराष्ट्र

maharashtra

पुन्हा एकदा चॅम्पियन्स लीग जिंकणं माझं लक्ष्य आणि स्वप्न - लिओनेल मेस्सी

By

Published : Aug 11, 2021, 10:46 PM IST

पुन्हा एकदा चॅम्पियन्स लीग जिंकणे हे माझे लक्ष्य आणि स्वप्न आहे, असे लिओनेल मेस्सीने सांगितलं.

My goal and dream is to win the Champions League once more: Messi
My goal and dream is to win the Champions League once more: Messi

पॅरिस -अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने बार्सिलोना क्लब सोडलं आहे. पॅरिस सेंट जर्मेन क्लबसोबत त्यानं नवा करार केला आहे. या करारनंतर मेस्सीने चॅम्पियन्स लीग जिंकण्याचे स्वप्न असल्याचे सांगितलं.

34 वर्षीय मेस्सीसोबत असताना बार्सिलोना क्लबने चार वेळा चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद पटकावले होते. त्याने बार्सिलोनासोबत अखेरचे विजेतेपद 2015 मध्ये पटकावले होते.

पीएसजीला अद्याप या स्पर्धेचे विजेतेपद जिंकता आलेले नाही. ते 2020 मध्ये अंतिम सामन्यात पोहोचले होते. परंतु त्यांचा बायर्न मूनिचने पराभव केला होता. तर त्या पाठीमागील हंगामात ते उपांत्य फेरीत पराभूत झाले होते.

मेस्सी पत्रकार परिषदेत म्हणाला, पुन्हा एकदा चॅम्पियन्स लीग जिंकणे माझे लक्ष्य आणि स्वप्न आहे. हे करण्यासाठी आमच्याकडे तगडा संघ आहे. दरम्यान, मेस्सीने पीएसजीसोबत दोन वर्षांचा करार केला आहे. तो करार मेस्सीला 3 वर्षे वाढवता येणार आहे.

दरम्यान, मेस्सीने सांगितलं होतं की, त्याला बार्सिलोना क्लब सोडायचे नव्हते. यासाठी त्याने आपली 50 टक्के फी देखील कमी करण्याची तयारी दर्शवली होती. परंतु बार्सिलोना क्लबने मेस्सीसोबत करार केला नाही. तेव्हा मेस्सीला पत्रकार परिषदेत अश्रू अनावर झाले होते.

फुटबॉल विश्वातील महान खेळाडूंच्या यादीत मेस्सीचे नाव आहे. त्याने बार्सिलोनासाठी 778 सामन्यात विक्रमी 672 गोल केले आहेत. त्याच्या प्रतिनिधीत्वात बार्सिलोनाने 35 विक्रमी विजेतेपद पटकावले आहेत.

हेही वाचा -women hockey team : ऑलिम्पिकमधील परफॉर्मन्स आगामी खेळांत मदत करेल - कर्णधार राणी रामपाल

हेही वाचा -मास्टर ब्लास्टरशी भेटली मीराबाई चानू, ऑलिम्पिक पदक पाहून सचिन तेंडुलकरचे रिअॅक्शन, पाहा फोटो

ABOUT THE AUTHOR

...view details