महाराष्ट्र

maharashtra

INDW vs NZW 3rd T-20 : न्यूझीलंडकडून सलग तिसऱ्या वनडेत भारताचा पराभव

By

Published : Feb 18, 2022, 1:13 PM IST

न्यूझीलंडने तिसऱ्या वनडे सामन्यात भारताचा 3 विकेट आणि 5 चेंडून पराभव ( NZ beat Ind by 3 wickets ) केला आहे. त्याचबरोबर पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

INDW vs NZW
INDW vs NZW

क्वीन्सटाउन : न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाने क्वीन्सटाउन येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातही भारतीय महिला संघाचा पराभव केला आहे. न्यूझीलंडने मालिकेत 3-0 अशी अभेद्य आघाडी ( New Zealand leads 3-0 ) घेतली आहे. या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने प्रथम फलंदाजी करताना 49.3 षटकांत 279 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने हे लक्ष्य 49.1 षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. न्यूझीलंडने महिला क्रिकेट इतिहासात दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च लक्ष पार करण्याचा विक्रम केला.

न्यूझीलंड संघाची कर्णधार सोफी डिवाइनने ( Sophie Devine captain New Zealand team ) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. मेघना आणि शेफाली या सलामी जोडीने पहिल्या विकेट्ससाठी 13 षटकांत शानदार 100 धावांची भागीदारी केली. मेघनाने अवघ्या 41 चेंडूत 61 धावा केल्या आणि शेफाली वर्माने 57 चेंडूत 51 धावा केल्या. मधल्या फळीत यास्तिका भाटियाने 19 आणि कर्णधार मिताली राजने 23 धावा केल्या.

त्यानंतर दीप्ती शर्माने 69 चेंडूत नाबाद 69 धावांची ( Deepti Sharma not out 69 runs ) खेळी करत आपल्या संघाला मजबूत धावसंख्येपर्यंत नेले. परंतु इतर फलंदाजांनी निराशा केली. त्यामुळे दीप्ती शर्माला चांगली साथ मिळाली नाही. त्यामुळे भारतीय संघ 49.3 षटकांत 279 धावांवर सर्वबाद झाला.

280 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या न्यूझीलंड संघाची सुरुवात खराब झाली. सुरुवातालाच झूलन गोस्वामीने दोन मोठे झटके दिल्याने न्यूझीलंड संघाची धावसंख्या 14/2 झाली. कर्णधार सोफी डिवाइन आपले खाते सुद्धा उघडू शकली नाही. मात्र त्यानंतर अमेलिया केर आणि एमी सॅदरवेटने तिसऱ्या विकेटसाठी 103 धावांची जबरदस्त भागीदारी केली. एमी सॅदरवेटने 59 धावा केल्या आणि अमेलिया केर 67 धावांची खेळी खेळून बाद झाली. शेवटी न्यूझीलंडने 49.1 षटकात सात फलंदाज गमावून 280 धावांचे लक्ष्य पूर्ण केले. भारताकडून झुलन गोस्वामीने 3 बळी ( Jhulan Goswami took 3 wickets ) घेतले.

ABOUT THE AUTHOR

...view details