महाराष्ट्र

maharashtra

Ruturaj Gaikwad Statement : आयुष्य ट्रॅकवर नाही, आयपीएलच्या कामगिरीने अपेक्षा वाढल्या - रुतुराज गायकवाड

By

Published : Jun 15, 2022, 3:41 PM IST

महाराष्ट्राच्या 25 वर्षीय खेळाडू रुतुराज गायकवाडने आतापर्यंत 36 आयपीएल ( IPL ) सामन्यांमध्ये 1207 धावा केल्या आहेत. परंतु सहा T20I मध्ये फक्त 120 धावा करू शकला, ज्यामध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या T20 मध्ये झळकावलेल्या पहिल्या अर्धशतकाचा समावेश आहे.

Ruturaj Gaikwad
Ruturaj Gaikwad

विशाखापट्टणम:भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातील पाच सामन्याच्या मालिकेतील तिसरा टी-20 सामना मंगळवारी पार पडला. हा सामना भारतीय संघाने 48 धावांनी जिंकला. या विजयात रुतुराज गायकवाडचे योगदान महत्वाचे होते. सलामीवीर ऋतुराज गायकवाड ( Opener Ruturaj Gaikwad ) इंडियन प्रीमियर लीग ( IPL ) मध्ये चांगल्या फॉर्ममध्ये होता, परंतु राष्ट्रीय संघाच्या कामगिरीमध्ये तो फॉर्म रुपांतरित करु शकला नव्हता. पण त्याला त्याची फारशी चिंता नाही. महाराष्ट्राच्या खेळाडूने आतापर्यंत 36 आयपीएल सामन्यांमध्ये 1207 धावा केल्या आहेत, परंतु 25 वर्षीय खेळाडूने मंगळवारी येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यात पहिले आंततरराष्ट्रीय अर्धशतक झळकावले. त्याने 6 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये केवळ 120 धावा केल्या आहेत.

'... हा खेळाचा भाग आहे' -

त्याचा नाराज झाला का, असे विचारले असता गायकवाड म्हणाला, "नाही, मी नाराज नाही, हा खेळाचा भाग आहे." तो म्हणाला, 'गेले वर्ष माझ्यासाठी खूप चांगले होते. त्यामुळे लोकांना खूप अपेक्षा होत्या. कारण जेव्हा तुमची आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी असते तेव्हा असे घडते.'

यंदाच्या आयपीएलमध्ये त्याच्या फॉर्ममध्ये चढ-उतार आले असले तरी, त्याने अखेरीस पुनरागमन केले आणि चेन्नई सुपर किंग्जसाठी (CSK) 14 सामन्यांमध्ये तीन अर्धशतकांसह 368 धावा केल्या. तो म्हणाला, 'आयपीएलमधली विकेट थोडी बॉलर फ्रेंडली होती. एकही सपाट विकेट नव्हती, चेंडू वळत होता आणि त्यात काहीसा स्विंग होता. गायकवाड म्हणाला, 'म्हणजे आयपीएलमधील तीन-चार सामन्यांमध्ये मी काही चांगल्या चेंडूंवर आऊट झालो, काही चांगले शॉट्स क्षेत्ररक्षकांच्या हातात गेले, पण हा सगळा T20 क्रिकेटचा भाग आहे.'

काही दिवस चांगले नसतात तर काही दिवस वाईट असतात -

रुतुराज म्हणाला, 'काही दिवस तुमच्यासाठी चांगले नसतात तर काही दिवस खरोखरच वाईट असतात. पण यामध्ये मानसिकदृष्ट्या चिकाटीने उभे राहणे आणि आपल्या प्रक्रियेवर विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे. गायकवाडने पहिल्या दोन सामन्यात 23 आणि 01 धावा केल्याने सलामीवीर म्हणून त्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मात्र, संघाला सर्वात जास्त गरज असताना त्याने चांगली खेळी खेळली, ज्यामुळे संघ मालिकेत टिकून राहिला. त्याने 35 चेंडूंत 7 चौकार आणि 2 षटकारांसह 57 धावा केल्या.

तो म्हणाला, 'मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये विकेट थोडी अवघड होती. मागील दोन सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणे सोपे नव्हते, परंतु येथील विकेट चांगली होती, चेंडू बॅटवर येत होता. त्यामुळे मी माझा ‘गेम’ खेळला.’ गायकवाड म्हणाला, ‘मी माझ्या विचारप्रक्रियेत काहीही बदल केलेला नाही. सर्व काही तसेच होते.

हेही वाचा -IND vs SA 3rd T-20 : तिसऱ्या सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेवर 48 धावांनी विजय

ABOUT THE AUTHOR

...view details