महाराष्ट्र

maharashtra

Jhulan Goswami to KL Rahul : केएल राहुलला झूलन गोस्वामीने केली गोलंदाजी, पहा व्हायरल व्हिडिओ

By

Published : Jul 19, 2022, 7:36 PM IST

दुखापतीमुळे गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20I मालिकेतून बाहेर पडल्यानंतर केएल राहुल पुनरागमन करण्यासाठी नेटमध्ये घाम गाळत आहे. तो वेगवाम महिला गोलंदाज झुलन गोस्वामीच्या गोलंदाजीवर सराव करत असतानाचा व्हिडिओ खुप व्हायरल होत ( Jhulan Goswami KL Rahul Video Viral ) आहे.

Jhulan KL
राहुल झूलन

मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 22 जुलैपासून वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे. दुखापतीमुळे गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20I मालिकेतून बाहेर पडल्यानंतर केएल राहुल ( Batsman KL Rahul ) पुनरागमन करण्यासाठी नेटमध्ये घाम गाळत आहे. जर्मनीतील शस्त्रक्रियेनंतर, राहुल बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) येथे सराव करत आहे. 29 जुलैपासून सुरू होणाऱ्या कॅरेबियन दौऱ्यातील T20 सामन्यासाठी तंदुरुस्त होण्यासाठी तो नेटमध्ये कठोर परिश्रम करताना व्हिडिओ व्हायरल झाला ( KL Rahul Video Viral ) आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये 30 वर्षीय सलामीवीर भारताच्या महिला क्रिकेट संघाची सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीच्या नेटवर फलंदाजी करत ( Jhulan Goswami bowls to KL Rahul ) आहे. 39 वर्षीय झुलन ही जगातील सर्वात धोकादायक वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे, जिने महिला वनडे आणि टी-20 मध्ये 300 हून अधिक बळी घेतले आहेत. झुलन बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारताच्या महिला संघाचा भाग नाही, कारण तिने 2018 मध्ये T20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. परंतु ती वनडे आणि कसोटी क्रिकेट खेळत आहे.

हा व्हिडिओ पाहून चाहत्यांनी दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत. एका यूजरने म्हटले की, झुलन गोस्वामीला गोलंदाजी ( Fast bowler Jhulan Goswami ) करताना पाहणे खूप छान वाटते. ही मोठी गोष्ट आहे. आम्ही सर्व त्यांना पाहण्याची वाट पाहत आहोत. झुलन गोस्वामी नेटमध्ये गोलंदाजी करत आहे. आपण तिला पुन्हा मैदानात पाहू का? दुसऱ्या युजरने लिहिले की, हा व्हिडिओ पाहून मला आनंद झाला. तर राहुल 22 जुलैपासून सुरू होणाऱ्या कॅरेबियन दौऱ्यासाठी वनडे संघाचा भाग नाही. 29 जुलैपासून सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या T20I मालिकेसाठी त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे, मात्र त्यासाठी त्याला आपला फिटनेस सिद्ध करावा लागेल. फिरकीपटू कुलदीप यादवचा टी-20 मालिकेतील समावेशही फिटनेसवर अवलंबून आहे.

हेही वाचा -Ethics officer and Ombudsman : बीसीसीआयचे नीतिशास्त्र अधिकारी आणि लोकपाल म्हणून विनीत सरन यांची नियुक्ती

ABOUT THE AUTHOR

...view details