महाराष्ट्र

maharashtra

Yashasvi Jaiswal Records : 21 वर्षांच्या यशस्वीने एकाच सामन्यात मोडले आयपीएलमधील अनेक विक्रम, जाणून घ्या..

By

Published : May 12, 2023, 5:10 PM IST

यशस्वी जयस्वालने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात एक असा विक्रम केला, जो त्याच्याआधी फक्त एकाच खेळाडूला करता आला आहे. यासह जयस्वालने कोलकाताविरुद्ध केवळ 13 चेंडूत 50 धावा करून आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक देखील झळकावले आहे.

Yashasvi Jaiswal Records
यशस्वी जयस्वाल रेकॉर्ड

कोलकाता : राजस्थान रॉयल्सचा युवा खेळाडू यशस्वी जयस्वालने गुरुवारी कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध नाबाद 98 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्यावने अनेक विक्रम आपल्या नावे केले. त्याने सामन्याच्या पहिल्या दोन चेंडूंवर सलग दोन षटकार मारून डावाला सुरुवात केली. आयपीएलमध्ये यापूर्वी असा पराक्रम केवळ एका खेळाडूनेच केला होता. अशाप्रकारे यशस्वीने आयपीएलच्या इतिहासात आपले नाव नोंदविले आहे.

आयपीएलमधील सर्वात वेगवान अर्धशतक ठोकले : यशस्वी जयस्वालने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 13 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 98 धावांची मॅच - विनिंग खेळी केली. या दरम्यान जयस्वालने केवळ 13 चेंडूत 50 धावा करून आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावले, तर डावाच्या पहिल्याच षटकात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीतही त्याने पृथ्वी शॉला मागे टाकले. जयस्वालने कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार नितीश राणा याच्या पहिल्याच षटकात 26 धावा ठोकल्या.

विराट कोहलीच्या कामगिरीची बरोबरी केली : या दरम्यान जयस्वालने विराट कोहलीच्या कामगिरीची बरोबरी केली. यशस्वीने आपल्या संघाच्या डावातील पहिल्या दोन चेंडूंवर षटकार ठोकले आणि अशी कामगिरी करणारा तो कोहलीनंतरचा केवळ दुसरा फलंदाज ठरला. आयपीएल 2019 मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या डावाच्या पहिल्या दोन चेंडूंवर विराट कोहलीने दोन षटकार ठोकले होते. मात्र तेव्हा सामना 5 षटकांचा करण्यात आला होता. त्यावेळी कोहली आरसीबीचा कर्णधार होता. गोलंदाजीला सुरुवात करण्यासाठी आलेल्या वरुण अ‍ॅरोनला कोहलीने सलग 2 षटकार ठोकले होते.

पहिल्याच षटकात 26 धावा केल्या : काल यशस्वी जयस्वालने केकेआरचा कर्णधार नितीश राणाला पहिल्याच षटकात सलग दोन षटकार ठोकले. पहिल्या दोन षटकारानंतरही जयस्वाल थांबला नाही आणि त्याने पहिल्याच षटकात 26 धावा केल्या. यासह हे षटक आयपीएलच्या इतिहासातील संयुक्त दुसरे सर्वात महागडे षटक ठरले. सामन्यानंतर जेव्हा नितीश राणाला पहिले षटक टाकण्याचे कारण विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला की, तो प्रयोग करण्याचा प्रयत्न करत होता, पण त्यात त्याला यश आले नाही. यशस्वी जयस्वालने चांगली फलंदाजी करत खेळ राजस्थानच्या बाजूने वळवला.

हेही वाचा :

  1. Virat Kohli Instagram Post : राजस्थान विरुद्धच्या मॅचपूर्वी विराट कोहलीने इंस्टाग्रामवर केला 'हा' फोटो शेअर, म्हणाला..
  2. IPL 2023 : कोणता संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्यात यशस्वी होणार ? दोन्ही संघांना संधी
  3. IPL 2023 : जोफ्रा आर्चरच्या जागी ख्रिस जॉर्डनचा मुंबई इंडियन्स संघात समावेश

ABOUT THE AUTHOR

...view details