महाराष्ट्र

maharashtra

IPL 2022 Updates : मुंबई इंडियन्सविरुद्ध हॅट्रिक पूर्ण न झाल्याने युझवेंद्र चहलची मोठी प्रतिक्रिया; जाणून घ्या काय म्हणाला

By

Published : Apr 3, 2022, 6:27 PM IST

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या फिरकीपटू युझवेंद्र चहलने ( Spinner Yuzvendra Chahal ) जबरदस्त गोलंदाजी केली. मात्र या सामन्यात त्याला हॅट्रिक पूर्ण करता आली नाही. त्यावर त्याने सामना संपल्यानंतर बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

Yuzvendra chahal
Yuzvendra chahal

मुंबई: आयपीएलचा नववा सामना शनिवारी रा़जस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स ( Rajasthan Royals vs Mumbai Indians ) संघात खेळला गेला. या सामन्यात रा़जस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सवर 23 धावांनी मात केली. त्याचबरोबर या हंगामातील आपला सलग दुसरा विजय नोंदवला. राजस्थानच्या विजयात जोस बटलर आणि युझवेंद्र चहलने महत्वाची भूमिका निभावली. या सामन्यात जोस बटलरने आपले शतक पूर्ण केले, मात्र युझवेंद्र चहलची हॅट्रिक पूर्ण झाली नाही. सामन्यानंतर बोलताना चहलने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात फिरकीपटू युझवेंद्र चहलने ( Spinner Yuzvendra Chahal ) जबरदस्त गोलंदाजी केली. त्याने अवघ्या 26 धावांत 2 बळी घेतले आणि या दरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट फक्त 6.50 होता. तो संघाचा सर्वात किफायतशीर गोलंदाज होता. एका क्षणी चहल हॅट्ट्रिकवर आला होता. ज्यामध्ये त्याने एकाच षटकात टीम डेव्हिड आणि डॅनियल सॅम्सच्या विकेट घेतल्या, पण तिसऱ्या चेंडूवर तो विकेट घेऊ शकला नाही. कारण करुण नायरने स्लिप्समध्ये झेल सोडला. हा झेल त्याने पकडला असता तर चहलची हॅट्रिक पूर्ण झाली असती.

राजस्थान रॉयल्सचा (RR) मुख्य फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians विरुद्धच्या सामन्यात हॅट्ट्रिक न घेण्याबाबत मोठे विधान केले आहे. हॅट्रिक पूर्ण न केल्याने नक्कीच वाईट वाटत असले तरी संघाच्या विजयाने आनंदी असल्याचे त्याने म्हटले आहे. तो म्हणाला, हॅट्रिक न घेतल्याने निश्चितच वाईट वाटले आहे, पण ठिक आहे. हे सर्व खेळात घडते. आम्ही जिंकलो ही चांगली गोष्ट आहे. जर मी हॅट्रिक घेतली असती, तर हा विजय आणखी चांगला झाला असता, कारण मी कधीही हॅट्रिक घेतलेली नाही.

2018 पासून राजस्थान रॉयल्सचे पारडे जड - राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा 23 धावांनी पराभव केला. यासह, संघाने या हंगामात सलग दुसरा विजय नोंदवला आणि मुंबई इंडियन्सचा हा सलग दुसरा पराभव झाला आहे. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने 20 षटकांत 193-8 अशी धावसंख्या उभारली होती. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्स संघ 170-8 अशीच धावसंख्या उभारू शकला. त्याचबरोबर 2018 पासून दोन्ही संघात आतापर्यंत 9 सामने झाले आहेत. त्यापैकी 6 सामन्यात राजस्थान संघाने विजय मिळवला आहे, तर तीन सामन्यात मुंबई संघाला विजय मिळवण्यात यश आहे. त्यामुळे राजस्थानचे पारडे जड राहिले आहे.

हेही वाचा -Ipl 2022 Csk Vs Pbks: आज सुपर किंग्स समोर पंजाब किंग्सचे आव्हान; सीएसके पहिल्या विजयाच्या शोधात

ABOUT THE AUTHOR

...view details