ETV Bharat / sports

IPL 2022 CSK vs PBKS: आज सुपर किंग्स समोर पंजाब किंग्सचे आव्हान; सीएसके पहिल्या विजयाच्या शोधात

author img

By

Published : Apr 3, 2022, 4:14 PM IST

आयपीएल 2022 ( IPL 2022 ) च्या 11व्या सामन्यात रविवारी म्हणजेच 3 एप्रिल रोजी गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा सामना पंजाब किंग्जशी होणार आहे. सीएसकेच्या संघाने आतापर्यंत खेळलेले दोन्ही सामने गमावले आहेत. त्याचबरोबर पंजाबच्या संघाने एक सामना जिंकला आहे. हा सामना सायंकाळी साडेसातपासून सुरू होईल.

CSK vs PBKS
CSK vs PBKS

मुंबई: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील अकरावा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स ( Chennai Super Kings vs Punjab Kings ) संघात खेळला जाणार आहे. हा सामना ब्रेबॉर्न स्टेडियम मुंबई येथे रविवारी रात्री साडे सात वाजता सुरु होईल. या मोसमात दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन सामने खेळले आहेत. रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखालील चेन्नई अजूनही पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. त्याचबरोबर मयंक अग्रवालच्या ( Mayank agarwal ) नेतृत्वाखाली पंजाबला मागील सामन्यातील पराभव विसरून पुनरागमन करायला आवडेल.

चेन्नई सुपर किंग्ज ( Chennai Super Kings ) चा संघ इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी करू शकलेला नाही. पण गतविजेत्याला परत आणण्यासाठी कर्णधार रवींद्र जडेजा आपल्या खेळाडूंनी रविवारी पंजाब किंग्जविरुद्ध अनेक गोष्टींमध्ये सुधारणा करावी अशी इच्छा आहे. CSK च्या मोहिमेची सुरुवात निराशाजनक झाली. स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (KKR) कडून पराभूत झाल्यानंतर, त्यांना लखनौ सुपर जायंट्स (LSG) या नवीन संघाकडून पराभव पत्करावा लागला. सुरुवातीच्या सामन्यात फलंदाजी अपयशी ठरले, तर दुसऱ्या सामन्यात दव पडल्याने गोलंदाजांसाठी अडचणी निर्माण झाल्या, त्यामुळे त्यांना 200 हून अधिक धावांचा बचाव करण्यात अपयश आले.

निकालात नाणेफेक महत्त्वपूर्ण - सामन्याच्या निकालात नाणेफेक महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याने, दुसऱ्या डावात दव पडल्यामुळे संघांनी लक्ष्याचा पाठलाग करण्याचा निर्णय घेत आहेत. त्यामुळे सीएसकेला आशा आहे की, ते ओल्या चेंडूने गोलंदाजी करण्यास अधिक चांगले तयार आहेत. एलएसजीच्या पराभवानंतर जडेजा म्हणाला, या टप्प्यात दव महत्त्वाचा भाग असेल. नाणेफेक जिंकल्यास प्रथम गोलंदाजी करणे पसंत कराल. खूप दव होते, बॉलही हातात येत नव्हता, ओल्या बॉलने सराव करावा लागेल.

चेन्नई सुपर किंग्स संघाचे पारडे जड - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स ( CSK vs PBKS ) संघात आतापर्यंत आयपीएल इतिहासात 25 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी 15 सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने विजय मिळवला आहे. त्याचबरोबर पंजाब किंग्स संघाने 10 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे रविवारी होणाऱ्या सामन्यात आपसूकच चेन्नई सुपर किंग्सचे पारडे जड राहणार आहे. त्याचबरोबर दोन्ही संघाला आपापल्या मागील सामन्यात पराभव पत्कारावा लागला आहे. त्यामुळे दोन्ही संघाचा डोळा हा सामना जिकंण्यावर असणार आहे. सर्वात जास्त हा सामना जिंकण्याची गरज सीएसकेला आहे. कारण त्यांनी अजून एक ही सामना जिंकलेला नाही.

चेन्नई सुपर किंग्ज : एमएस धोनी, रवींद्र जडेजा (कर्णधार), मोईन अली, रुतुराज गायकवाड, ड्वेन ब्राव्हो, दीपक चहर, अंबाती रायुडू, रॉबिन उथप्पा, मिचेल सँटनर, ख्रिस जॉर्डन, अॅडम मिल्ने, डेव्हॉन कॉनवे, शिवम दुबे, ड्वेन प्रिटोरियस, महेश तिक्ष्णा, राजवर्धन हंगरगेकर, तुषार देशपांडे, केएम आसिफ, सी हरी निशांत, एन जगदीसन, सुब्रांशू सेनापती, के भगत वर्मा, प्रशांत सोलंकी, सिमरजीत सिंग आणि मुकेश चौधरी.

पंजाब किंग्स : मयंक अग्रवाल (कर्णधार), शिखर धवन, अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा, जॉनी बेअरस्टो, राहुल चहर, हरप्रीत ब्रार, शाहरुख खान, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा, इशान पोरेल, लियाम लिव्हिंगस्टोन, ओडियन स्मिथ, संदीप शर्मा, राज अंगद बावा, ऋषी धवन, प्रेरक मंकड, वैभव अरोरा, हृतिक चॅटर्जी, बलतेज धांडा, अंश पटेल, नॅथन एलिस, अथर्व तायडे, भानुका राजपक्षे आणि बेनी हॉवेल.

हेही वाचा - Women Cricket World Cup 2022: इंग्लंडला 71 धावांनी हरवून ऑस्ट्रेलियाने सातव्यांदा पटकावले विजेतेपद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.