महाराष्ट्र

maharashtra

IPL 2021 : होय, आमची त्यावेळी भीतीने गाळण उडाली होती, KKR चे कोच ब्रँडन मॅक्युलमची कबुली

By

Published : Sep 14, 2021, 4:51 PM IST

मला वाटत आयपीएल 2021 च्या पहिल्या सत्रात आम्ही खूप घाबरलेले होतो, अशी कबुली ब्रँडन मॅक्युलम यांनी दिली. दरम्यान, त्यावेळी भारतात कोरोनाचा संसर्ग वाढला होता. यात अनेकांना आपला जीव गमावावा लागला होता.

IPL 2021 : There were times when we were paralysed by fear: KKR coach Brendon McCullum
IPL 2021 : होय, आमची त्यावेळी भीतीने गाळण उडाली होती, केकेआरचे प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलमची कबुली

अबुधाबी - आयपीएल 2021 पहिल्या सत्रात भारतामध्ये कोरोना महामारी पसरली होती. तेव्हा आमची भीतीने गाळण उडाली होती, अशी कबुली कोलकाता नाइट रायडर्स संघाचे मुख्य प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलम यांनी दिली. दरम्यान केकेआरचा फिरकीपटू वरुण चक्रवर्ती आणि वेगवान गोलंदाज संदीप वॉरियर सर्वात पहिले मे महिन्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळले. तेव्हा सुरू असलेला आयपीएल तात्काळ स्थगित करण्यात आला होता. आता तो उर्वरित हंगाम यूएईमध्ये खेळवण्यात येत आहे.

केकेआरची आयपीएल 2021 च्या पहिल्या सत्रात कामगिरी चांगली राहिली नाही. ते गुणतालिकेत सातव्या स्थानी आहेत. पण प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलम यांना आशा आहे की, केकेआर 19 सप्टेंबरपासून यूएईत सुरू होणाऱ्या उर्वरित हंगामात चांगली कामगिरी करेल. मॅक्युलन यांनी केकेआरच्या वेबसाईटवर लिहलं की, आम्ही दुसऱ्या सत्रात चांगली कामगिरी करू. आम्हाला एक दुसऱ्याचे मनोबल वाढवावा लागेल आणि पुढील चार ते पाच आठवडे चांगली कामगिरी नोंदवावी लागेल.

मला वाटत की, आयपीएल 2021 च्या पहिल्या सत्रात आम्ही खूप घाबरलेले होतो, अशी कबुली देखील ब्रँडन मॅक्युलम यांनी दिली. त्यावेळी भारतात कोरोनाचा संसर्ग वाढला होता. यात अनेकांना आपला जीव गमावावा लागला होता.

जेव्हा मी भारत सोडलं, तेव्हा प्रत्येकाला कल्पना झाली होती की प्रशिक्षकाला काय अपेक्षित आहे, असे देखील मॅक्युलन यांनी सांगितलं. दरम्यान, दुसऱ्या सत्रात केकेआरचा पहिला सामना 20 सप्टेंबर रोजी अबुधाबीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासोबत होणार आहे. कोलकाताचा संघ पहिल्या सत्रात 5 सामन्यातील पराभवासह गुणतालिकेत 7 व्या स्थानावर आहे.

हेही वाचा -SL vs SA: दक्षिण आफ्रिकेचा टी-20 मालिकेवर कब्जा; दुसऱ्या टी-20 सामन्यात श्रीलंकेचा दारूण पराभव

हेही वाचा -ICC ODI Rankings : मिताली राज अव्वलस्थानी कायम, पण 'या' खेळाडूने वाढवली चिंता

ABOUT THE AUTHOR

...view details