महाराष्ट्र

maharashtra

Ind W Vs Eng W ३rd ODI : झूलन गोस्वामीचा विश्वविक्रम, असा कमाल करणारी जगातील एकमेव गोलंदाज

By

Published : Jul 3, 2021, 8:16 PM IST

भारतीय महिला क्रिकेट संघाची गोलंदाज झूलन गोस्वामी, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २ हजाराहून अधिक षटके गोलंदाजी करणारी जगातील एकमात्र गोलंदाज ठरली. कसोटीत झूलनने ३४९, एकदिवसीयमध्ये १५०० हून अधिक तर टी-२० मध्ये २२५ षटके फेकली आहेत.

jhulan-goswami-is-the-first-ever-woman-to-bowl-2000-overs-in-international-cricket
Ind W Vs Eng W 3rd ODI : झूलन गोस्वामीचा विश्वविक्रम, असा कमाल करणारी जगातील एकमेव गोलंदाज

वॉर्सेस्टर - तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून इंग्लंड महिला क्रिकेट संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे निमंत्रण दिले. तेव्हा भारतीय गोलंदाजी दरम्यान, झूलन गोस्वामीने एक खास विक्रम आपल्या नावे केला. ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २ हजाराहून अधिक षटके गोलंदाजी करणारी जगातील एकमात्र गोलंदाज ठरली. कसोटीत झूलनने ३४९, एकदिवसीयमध्ये १५०० हून अधिक तर टी-२० मध्ये २२५ षटके तिने फेकली आहेत.

महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये झूलनची कामगिरी

झूलन महिला एकदिवसीय क्रिकेट इतिहासात सर्वाधिक गडी बाद करणारी गोलंदाज आहे. तिच्या नावे बातमी लिहिपर्यंत २३५ विकेट आहेत. कसोटीत तिने ४१ गडी बाद केले आहे. तर टी-२० क्रिकेटमध्ये तिच्या नावे ५६ विकेट आहेत.

अनुष्का साकारणार झूलनची भूमिका

झूलनने २००२ मध्ये डेब्यू केला होता. डेब्यूपासून आतापर्यंत झूलन भारतीय महिला गोलंदाजीचा डिपार्टमेंट सांभाळत आहे. झूलन गोस्वामीवर बॉलिवूड चित्रपट तयार करण्यात येणार आहे. यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याची अभिनेत्री पत्नी अनुष्का शर्मा झूलनची भूमिका करणार आहे.

झूलनच्या बायोपिकच्या शूटिंगला लवकरच सुरूवात होणार आहे. अनुष्का शर्मा झूलनची भूमिका करण्यासाठी खूप तयारी करत आहे. झूलन शिवाय भारतीय महिला संघाची दिग्गज मिताली राज हिच्यावर देखील चित्रपट तयार करण्यात येत आहे. यात अभिनेत्री तापसी पन्नू मितालीची भूमिका करणार आहे.

दरम्यान, भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघात तीन सामन्याची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेत भारतीय संघ २-० ने पिछाडीवर आहे. भारतीय संघ आजचा सामना जिंकून मालिकेचा शेवट गोड करण्याच्या इराद्याने मैदानात उतरला आहे.

हेही वाचा -गुड न्यूज! स्थानिक क्रिकेटला होणार सुरुवात, BCCIने जाहीर केले वेळापत्रक

हेही वाचा -WI VS PAK : सामना सुरू असताना विडींजचे २ खेळाडू अचानक मैदानावर कोसळले, स्ट्रेचरवरून नेले थेट रुग्णालयात

ABOUT THE AUTHOR

...view details