महाराष्ट्र

maharashtra

IND vs WI : पहिल्या टी-20 सामन्यात दीपक चहर आणि व्यंकटेश अय्यरला दुखापत

By

Published : Feb 17, 2022, 7:33 PM IST

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात टी-20 मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना बुधवारी पार पडला. ज्यामध्ये किरोन पोलार्डने मारलेल्या शॉटमुळे दोन भारतीय खेळाडूंना दुखापत ( Two Indian players injured ) झाली.

Chahar and Venkatesh
Chahar and Venkatesh

कोलकाता -ईडन गार्डनवर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला टी-20 सामना पार पडला. या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर 6 विकेट्सने मात केली. परंतु या सामन्यात भारताच्या दोन खेळाडूंना दुखापत ( Two Players Injured in T20 Match ) देखील झाली.

भारतीय संघाचे खेळाडू दीपक चहर आणि व्यंकटेश अय्यर ( Deepak Chahar and Venkatesh Iyer Injured ) यांना बुधवारी झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात दुखापत झाली आहे. चेन्नई सुपर किंग्सने लिलावात 14 कोटी बोली लावक विकत घेतलेल्या दीपक चहरवर सर्वांच्या नजरा होत्या. त्याने या सामन्यात एक विकेट देखील घेतली. परंतु या सामन्यात तो आपल्या गोलंदाजीचा कोटा पूर्ण करु शकला नाही. दीपक चहरला स्क्वेयर लेग क्षेत्राात फिल्डींग करत असताना, कॅरेबियन खेळाडू किरोन पोलार्डने एक जोरदार पूल शॉट मारलेला चेंडू, अडवताना दीपक चहरच्या उजव्या हाताला ( Deepak Chahar right hand Injured ) लागला.

हा पूल शॉट इतका जोरात मारला होता, की ज्यामुळे दीपक आपल्या गोलंदाजीचा कोटा पूर्ण करु शकला नाही. तसेच त्याला ड्रेसिंग रूम मध्ये पाठवण्यात आले. ही घटना 19 व्या षटकातील होती, जेव्हा वेस्ट इंडिजचा संघ फलंदाजी करत होता. त्यामुळे शेवटचे षटक हर्षल पटेलने टाकले.

दुसरीकडे, त्याच्या अगोदर 17 व्या षटकात पोलार्डचा शॉट अडवताना व्यंकटेश अय्यरच्या उजव्या हाताला दुखापत ( Injury to Venkatesh Iyer ) झाली होती. तसेच आताया दोघांचे स्कॅनिंग केले जाईल. त्यानंतर ते या मालिकेत पुढे खेळू शकतील की नाही हे कळेल.

ABOUT THE AUTHOR

...view details