महाराष्ट्र

maharashtra

Cricket World Cup २०२३ : डेंग्यूनं ग्रस्त शुभमन गिल पाकिस्तानविरुद्ध खेळणार का? जाणून घ्या हेल्थ अपडेट

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 11, 2023, 7:46 PM IST

Cricket World Cup २०२३ : टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिल सध्या आजारी असून त्याला डेंग्यू झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी त्याला ताप आला होता. यानंतर त्याची प्रकृती बिघडली. त्याच्या प्रकृतीचं अपडेट जाणून घेण्यासाठी वाचा ही बातमी..

Shubman Gill
Shubman Gill

नवी दिल्ली Cricket World Cup २०२३ : भारतीय संघाचा सलामीवीर शुभमन गिलबाबत एक मोठं अपडेट समोर आलंय. शुभमन गिलला डेंग्यूची लागण झाली होती. त्यामुळे तो ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्ताविरुद्धचे पहिले दोन सामने खेळू शकला नाही. गिल याची तब्येत अचानक बिघडल्यामुळे मंगळवारी त्याला चेन्नई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेथे उपचार केल्यानंतर त्याला डिस्चार्ज देऊन हॉटेलमध्ये हलवण्यात आलं. मात्र तो अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडियासोबत दिल्लीला आला नव्हता.

बीसीसीआयच्या देखरेखीखाली उपचार केले जातील : आता ताज्या वृत्तानुसार, शुभमन गिल चेन्नईहून सरळ अहमदाबादला जाणार आहे. तेथे त्याच्यावर बीसीसीआयच्या देखरेखीखाली पुढील उपचार केले जातील. १४ ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी गिल फिट होण्याची शक्यता आहे. या सामन्यासाठी गिलचा संघात समावेश होऊ शकतो. त्याच्या अनुपस्थितीत युवा विकेटकीपर फलंदाज इशान किशनला ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरुद्धचे पहिले दोन सामने खेळण्याची संधी मिळाली.

रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला : शुभमन गिल सध्या तापानं त्रस्त आहे. मंगळवारी प्लेटलेट काउंट अचानक कमी झाल्यानं त्याला चेन्नईतील कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याच्या प्लेटलेट्सची संख्या ७५ हजारांवर पोहोचली होती. त्यानंतर त्यांच्यावर तातडीनं उपचार करण्यात आले. जेव्हा त्याची प्लेटलेटची संख्या १ लाखांपेक्षा जास्त झाली, तेव्हा त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र तो अजूनही मॅच खेळण्यासाठी पूर्णपणे फिट नाही. आता तो आगामी पाकिस्तानविरुद्धच्या महत्वाच्या सामन्यासाठी फिट होतो की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा :

  1. Cricket World Cup २०२३ : भारत-पाकिस्तान सामन्यासाठी पीसीबी प्रमुख भारतात येणार
  2. Cricket World Cup 2023 : श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यानंतर बाबर आझमनं काय केलं, हैदराबादच्या ग्राउंड स्टाफला...
  3. Cricket World Cup 2023 : 'भावानं सर्वोत्तम कामगिरी करून विश्वचषक जिंकवून द्यावा'; रविंद्र जडेजाच्या बहिणीची 'ETV भारत'शी खास बातचीत

ABOUT THE AUTHOR

...view details