महाराष्ट्र

maharashtra

ICC T20 Rankings : स्मृती मंधानाने आयसीसी टी-20 क्रमवारीत पटकावले कारकिर्दीतील सर्वोत्तम दुसरे स्थान

By

Published : Sep 20, 2022, 6:40 PM IST

Smriti Mandhana
स्मृती मंधाना

उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेली टीम इंडियाची सलामीवीर स्मृती मंधानाने ( Opener Smriti Mandhana ) महिला क्रिकेटच्या ताज्या जागतिक क्रमवारीत टी-20 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जबरदस्त फायदा करून घेतला आहे. तिने दुसऱ्या क्रमांकावर मजल मारली आहे.

दुबई: भारताची स्टार सलामीवीर स्मृती मंधाना इंग्लंडविरुद्धच्या तिच्या शानदार कामगिरीचा तिला ताज्या आयसीसी महिला क्रिकेट टी-20 क्रमवारीत ( ICC Women Cricket T20 Ranking ) फायदा झाला आहे. ती टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करिअरमधील सर्वोत्तम दुसऱ्या स्थानावर पोहोचली ( Smriti Mandhana career best 2nd position ) आहे. त्याचवेळी स्मृती वनडेत सातव्या स्थानावर पोहोचली.

डावखुरी फलंदाज मंधानाने ( Left handed batsman Smriti Mandhana ) इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 111 धावा केल्या. या कामगिरीच्या जोरावर तिला दोन स्थानांची प्रगती करता आली आहे. यापूर्वी वनडेमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेल्या मंधानाने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 91 धावांची मॅच-विनिंग खेळी खेळली. ज्यामुळे तिला तीन स्थानांची प्रगती साधता आली.

इतर भारतीय खेळाडूंमध्ये, कर्णधार हरमनप्रीत कौर ( Captain Harmanpreet Kaur ) एकदिवसीय क्रमवारीच चार स्थानांनी प्रगती करत नवव्या स्थानावर आली आहे, तर अष्टपैलू दीप्ती शर्माने ( All rounder Deepti Sharma ) एका स्थानाने प्रगती करत 32व्या स्थानावर पोहोचली आहे. होव्ह येथे भारताच्या सात विकेट्सने विजय मिळवून देण्यात मोलाचा उचलणारी, यष्टीरक्षक फलंदाज यास्तिका भाटियाने आठ स्थानांची प्रगती करत 37व्या स्थानावर झेप घेतली आहे. दीप्तीनेही गोलंदाजांच्या यादीत सहा स्थानांनी प्रगती करत 12व्या स्थानावर मजल मारली आहे.

टी-20 क्रमवारीत हरमनप्रीतने फलंदाजांच्या यादीत एक स्थानाने प्रगती करत 14व्या स्थानावर पोहोचली आहे, तर गोलंदाजांमध्ये रेणुका सिंग तीन स्थानांनी 10व्या आणि फिरकीपटू राधा यादवने ( Spinner Radha Yadav ) चार स्थानांनी प्रगती करत 14व्या स्थानावर पोहोचली आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत स्नेह राणा आणि पूजा वस्त्राकर संयुक्तपणे 41व्या स्थानावर आहेत.

हेही वाचा -IND vs AUS T20 Series : सलग दुसरी मालिका जिंकण्यास टीम इंडिया सज्ज; बुमराह, हर्षलच्या कामगिरीवर असणार विशेष लक्ष

ABOUT THE AUTHOR

...view details