महाराष्ट्र

maharashtra

सचिनच्या 'त्या' ट्विटवर कांबळीचे रिट्विट, म्हणाला.. तुझ्यामुळे मी आचरेकर सरांचा...

By

Published : Aug 3, 2019, 7:47 PM IST

कांबळी आपल्या ट्विटमध्ये म्हणतो, तुला आठवण आहे का तो दिवस, आपण दोघे फलंदाजी करत होतो. त्यावेळी एक पतंग खेळपट्टीवर येऊन पडली आणि ती पतंग घेऊन मी उडवायला सुरुवात केली. तेव्हा गुरु रमाकांत आचरेकर सर तिथे आले. तु त्यांना पाहिले तरी, मला ते येत आहेत, याची कल्पना दिली नाही. यानंतर पुढे काय झाले हे आपल्या दोघांनाच माहित आहे. असे सांगत कांबळीने पुढे दोन इमोजी लावले आहेत. त्यामध्ये एक इमोजी राग दर्शवणारा आहे तर दुसरा बॉक्सिंग ग्लोज दर्शवणारा आहे.

सचिनच्या 'त्या' ट्विटवर कांबळीचे रिट्विट, म्हणाला.. तुझ्यामुळे मी आचरेकर सरांचा...

मुंबई - भारताचा मास्टर ब्लास्टर खेळाडू सचिन तेंडूलकरने फ्रेंडशीप डेच्या पार्श्वभूमिवर विनोद कांबळीसोबतचा एक फोटो ट्विट केला आहे. या ट्विटसोबत त्याने 'कांबळ्या, शालेय दिवसातील हा फोटो मला मिळाला आहे. जुन्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत, म्हणून मी हा फोटो पुन्हा टाकतोय' असे मजेशीर कॅप्शनही दिले आहे. सचिनच्या या ट्विटवर विनोद कांबळीने रिट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

कांबळी आपल्या ट्विटमध्ये म्हणतो, तुला आठवण आहे का तो दिवस, आपण दोघे फलंदाजी करत होतो. त्यावेळी एक पतंग खेळपट्टीवर येऊन पडली आणि ती पतंग घेऊन मी उडवायला सुरुवात केली. तेव्हा गुरु रमाकांत आचरेकर सर तिथे आले. तु त्यांना पाहिले तरी, मला ते येत आहेत, याची कल्पना दिली नाही. यानंतर पुढे काय झाले हे आपल्या दोघांनाच माहित आहे. असे सांगत कांबळीने पुढे दोन इमोजी लावले आहेत. त्यामध्ये एक इमोजी राग दर्शवनारा आहे तर दुसरा बॉक्सिंग ग्लोज दर्शवणारा आहे.

दरम्यान, भारतीय क्रिकेट जगतात सचिन आणि कांबळी यांची मैत्री नेहमीच चर्चेत असते. दोघांनाही दिवंगत रमाकांत आचरेकर यांनी प्रशिक्षण दिले आहे. काही वर्षांपूर्वी दोघांच्या मैत्रीमध्ये दुरावा आला होता. मात्र, दोघांनी केलेले मिश्किल ट्विट पाहून दोघे पुन्हा जिगरी मित्र असल्याचे दिसून येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details