महाराष्ट्र

maharashtra

IND vs NZ : एकदिवसीय मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर, 'हा' खेळाडू ३ वर्षांनी संघात

By

Published : Jan 30, 2020, 2:03 PM IST

Updated : Jan 30, 2020, 2:52 PM IST

वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन आणि मॅट हॅन्री दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत. तर दुसरीकडे टॉम लाथमची दुखापतीतून सावरल्यानंतर संघात वापसी झाली आहे. ईश सोढीला पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी संघात स्थान देण्यात आले आहे.

India vs New Zealand: Tom Latham returns but Trent Boult, Lockie Ferguson remain unavailable for ODI series
IND vs NZ : एकदिवसीय मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर, 'हा' खेळाडू ३ वर्षांनी संघात

ऑकलंड- न्यूझीलंड संघाने भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. हॅमिश बेनेटची ३ वर्षांनी न्यूझीलंडच्या एकदिवसीय संघात वापसी झाली आहे. तर कायले जॅमीसन आणि स्कॉट कुग्लेट यांनाही १३ सदस्यीय संघात संधी मिळाली आहे.

वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन आणि मॅट हॅन्री दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत. तर दुसरीकडे टॉम लाथमची दुखापतीतून सावरल्यानंतर संघात वापसी झाली आहे. ईश सोढीला पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी संघात स्थान देण्यात आले आहे.

भारत-न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक -

  • पहिला एकदिवसीय सामना : हॅमिल्टन - ०५ फेब्रुवारी २०२०
  • दुसरा एकदिवसीय सामना : ऑकलंड - ०८ फेब्रुवारी २०२०
  • तिसरा एकदिवसीय सामना : माऊंट माउंगानुई - ११ फेब्रुवारी २०२०

असा आहे न्यूझीलंडचा एकदिवसीय संघ -

  • केन विल्यम्सन (कर्णधार), हॅमिश बेनेट, टॉम ब्लंडेल, कॉलिन डी ग्रँडहोम, मार्टिन गुप्टिल, काइल जॅमीसन, स्कॉट कुगलेइजन, टॉम लाथम, जिमी नीशम, हेनरी निकोल्स, मिशेल सेंटनर, ईश सोढ़ी (पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी), टिम साउदी आणि रॉस टेलर

असा आहे भारतीय एकदिवसीय संघ -

  • विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दूबे, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकुर आणि केदार जाधव.
Last Updated : Jan 30, 2020, 2:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details