महाराष्ट्र

maharashtra

BCCI Media Rights : टीम इंडियाचे सामने कोणत्या चॅनलवर दिसणार? बीसीसीआयने काढले टेंडर

By

Published : Aug 2, 2023, 8:59 PM IST

बीसीसीआयने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत सामन्यांच्या मीडिया हक्कांसाठी निविदा जारी केली आहे. खुद्द बोर्डाने आपल्या अधिकृत ट्विटरवरून ही माहिती दिली.

BCCI
बीसीसीआय

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) बुधवारी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत सामन्यांसाठी मीडिया हक्क निविदा जारी केली. मंडळानुसार निविदा प्रक्रियेच्या अटी व शर्ती, निविदेचे आमंत्रण (ITT) मध्ये उपलब्ध असतील. हे 15 लाख रुपये नॉन-रिफंडेबल फी जमा केल्यावर खरेदी केले जाऊ शकते.

बोलीसाठी कोण पात्र असतील : ITT 25 ऑगस्ट 2023 पर्यंत खरेदीसाठी उपलब्ध असेल. बोली सादर करू इच्छिणाऱ्या पक्षाने ITT खरेदी करणे आवश्यक आहे. तथापि, जे आयटीटीमध्ये विहित केलेले पात्रता निकष पूर्ण करतात आणि त्यामध्ये विहित केलेल्या इतर अटी व शर्तींच्या अधीन असतील तेच बोलीसाठी पात्र असतील. केवळ ITT खरेदी केल्याने कोणत्याही संस्थेला बोली लावता येणार नाही. बीसीसीआयने ट्विट करून ही माहिती दिली. बीसीसीआयने असेही नमूद केले की, त्यांच्याकडे कोणतेही कारण न देता कोणत्याही टप्प्यावर बोली प्रक्रिया रद्द करण्याचा किंवा त्यात बदल करण्याचा अधिकार आहे.

डिस्ने-स्टारने 6,138 कोटी रुपयांची बोली लावली होती : बीसीसीआय आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत सामन्यांसाठी मीडिया अधिकार संपादन करण्यासाठी नामांकित संस्थांकडून बोली आमंत्रित करते. यापूर्वी बीसीसीआयने 2018 ते 2023 या पाच वर्षांच्या कालावधीसाठी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत सामन्यांसाठी मीडिया हक्क निविदा जारी केली होती. तेव्हा डिस्ने-स्टारने 6,138 कोटी रुपयांची, तर सोनी कंपनीने 6,118 कोटी रुपयांची बोली लावली होती. अखेर हे प्रसारणाचे हक्क डिस्ने-स्टारला मिळाले होते. डिस्ने-स्टारने या कालावधीत बीसीसीआयला एका सामन्यासाठी जवळपास 61 कोटी रुपये दिले.

टीव्ही आणि डिजीटलसाठी वेगवेगळे हक्क विकणार : त्यापूर्वीच्या चक्रात, स्टार इंडियाने द्विपक्षीय क्रिकेट हक्क मिळविण्यासाठी 3,851 कोटी रुपये दिले होते. बीसीसीआय आता या चक्रात टीव्ही आणि डिजीटलसाठी वेगवेगळे हक्क विकणार आहे. बोर्डाने आयपीएलसाठी देखील हेच तंत्र वापरले होते. यामुळे बीसीसीआयला जास्त फायदा होणार आहे. बीसीसीआयला आयपीएल मीडिया राइट्स विक्रीतून तब्बल 48,390 कोटी रुपये मिळाले होते.

हेही वाचा :

  1. Jasprit Bumrah : अखेर प्रतीक्षा संपली!, जसप्रीत बुमराहचे टीम इंडियात धडाक्यात पुनरागमन
  2. ICC World Cup 2023 : क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी; 'या' तारखेपासून विश्वचषकाच्या तिकिटांची ऑनलाइन विक्री सुरू होणार
  3. Asian Games 2023 : टीम इंडियाला मिळाली थेट क्वार्टरफायनलमध्ये एंट्री! जाणून घ्या कशी

ABOUT THE AUTHOR

...view details