महाराष्ट्र

maharashtra

Australia Tour of Sri Lanka : श्रीलंका दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या टी-20, वनडे आणि कसोटी संघाची घोषणा

By

Published : Apr 29, 2022, 12:51 PM IST

ऑस्ट्रेलियाचा श्रीलंका दौरा हा 7 जूनपासून सुरू होणार आहे. या अगोदर ऑस्ट्रेलियाच्या तिन्ही संघाची घोषणा ( Australian three teams announced )करण्यात आली आहे. त्याचबरोबर पूर्णवेळ प्रशिक्षक म्हणून अँड्र्यू मॅकडोनाल्डचा हा पहिलाच दौरा असणार आहे.

Australia
Australia

हैदराबाद: ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ ( Australian Cricket Team ) श्रीलंका संघाच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात कसोटी, वनडे आणि टी-20 मालिका खेळली जाणार आहे. आता या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या तिन्ही संघांची घोषणा केली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या दौऱ्यासाठी 34 खेळाडूंची निवड केली असून त्यात 16 सदस्यीय 'अ' संघही आहे. अ‍ॅरॉन फिंच ( Aaron Finch ) वनडे आणि टी-20 चे कर्णधार असेल, तर पॅट कमिन्स ( Pat Cummins ) कसोटी संघाचे नेतृत्व करेल. याशिवाय ऑस्ट्रेलिया अ संघाचीही घोषणा करण्यात आली असून त्यात अनेक खेळाडूंना स्थान मिळाले आहे.

ऑस्ट्रेलियाचा श्रीलंका दौरा हा 7 जूनपासून सुरू होणार आहे. दोन्ही संघांमध्ये पहिल्यांदा तीन सामन्यांची टी-20 मालिका होणार आहे. त्यानंतर पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि त्यानंतर दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाईल. एकदिवसीय मालिका 14 जूनपासून तर कसोटी मालिका 29 जूनपासून सुरू होणार आहे. त्याचबरोबर पूर्णवेळ प्रशिक्षक म्हणून अँड्र्यू मॅकडोनाल्डचा ( Coach Andrew MacDonald ) हा पहिलाच दौरा असणार.

श्रीलंका दौऱ्यासाठी ऑस्ट्रलियाचे तीन संघ -

टी-20 संघ -अ‍ॅरॉन फिंच (कर्णधार), शॉन अ‍ॅबॉट, अ‍ॅश्टन अगर, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, ऱ्हाय रिचर्डसन, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, मिचेल स्वीपसन, मॅथ्यू वेड आणि डेव्हिड वॉर्नर.

एकदिवसीय संघ - अ‍ॅरॉन फिंच (कर्णधार), अ‍ॅश्टन आगर, अ‍ॅलेक्स कॅरी, पॅट कमिन्स, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, मिचेल स्वीपसन आणि डेव्हिड वॉर्नर .

कसोटी संघ : पॅट कमिन्स (कर्णधार), अ‍ॅश्टन आगर, स्कॉट बोलँड, अ‍ॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), मिचेल स्टार्क, मिचेल स्वीपसन आणि डेव्हिड वॉर्नर.

हेही वाचा -KIUG 2021 : ऑलिम्पियन जलतरणपटू श्रीहरी नटराजने जिंकली तीन सुवर्णपदके, जैन विद्यापीठाने जलतरण तलावावर राखले वर्चस्व

ABOUT THE AUTHOR

...view details