महाराष्ट्र

maharashtra

2023 Cricket World Cup : अक्षर पटेलसाठी क्रिकेट विश्वचषकतील सुवर्ण संधी यावेळीही हुकली, भावाची भावनिक प्रतिक्रिया

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 30, 2023, 9:41 PM IST

2023 Cricket World Cup :गुजरातमधून येणारा भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल आशिया चषकादरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे तो वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी भारताच्या संघात ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनचा समावेश करण्यात आला आहे. येत्या 5 ऑक्टोबरपासून विश्वचषक क्रिकेट स्पर्धा सुरू होत आहे.

अक्षर पटेल
अक्षर पटेल

अहमदाबाद (गुजरात)2023 Cricket World Cup: डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेल गेल्या तीन वर्षांपासून भारतीय संघासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. या 29 वर्षीय क्रिकेटपटूने स्वत:ला एक उत्त क्रिकेटर म्हणून सिद्ध केलं आहे. त्यानं पाटा खेळपट्टीवर चमत्कार केले आहेत. आशिया कपमध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात अक्षराला दुखापत झाली होती. अक्षर त्याच्या दुखापतीतून सावरला नसल्यानं अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनला संघात परत आणण्यात आलं आहे.

या विश्वचषकात 'मेन इन ब्लू'साठी अक्षर महत्त्वाचा खेळाडू ठरू शकला असता. भारतात खेळल्या गेलेल्या क्रिकेट सामन्यांमध्ये डावखुरे फिरकीपटू यशस्वी ठरले आहेत. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये खेळून अक्षरला परदेशी खेळाडूंच्या कमकुवतपणाची जाणीव होती. परंतु त्याला भारतीय संघातून वगळण्यात आल्यानं तो यावेळी त्याचं कौशल्य भारतासाठी या महा क्रीडा स्पर्धेत वापरू शकणार नाही.

अक्षरची 2015 च्या विश्वचषकासाठी निवड झाली होती पण तो एकही सामना खेळला नाही. दुखापतीमुळे तो 2023 चा विश्वचषकही तो खेळू शकणार नाही. याबद्दल आम्ही निराश आहोत. त्याला प्रतिष्ठित एकदिवसीय सामने खेळताना पाहून आम्हाला खूप आनंद झाला. अहमदाबादमध्ये त्याचे आयोजन केले जाणार आहे. त्याला संघातून वगळण्यात आल्याचं आम्हाला दु:ख आहे. आम्हा सर्वांना त्याला दमदार क्रिकेट खेळताना, लवकरच क्रिकेटच्या मैदानावर परतताना पाहायचा आहे." - सनशिप पटेल, अक्षरचा भाऊ

याबाबत आम्ही अक्षरच्या घरच्यांशी संवाद साधला. अक्षराचा भाऊ सनशिप पटेल याने ईटीव्ही भारतला सांगितलं की, 2023 चा विश्वचषक अक्षर पटेलसाठी अष्टपैलू खेळाडू म्हणून सिद्ध करण्याची सुवर्ण संधी झाला असता. मात्र आता त्याला काही करता येणार नाही. अक्षर पटेलने आशिया चषक स्पर्धेत गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलं. आशिया चषक स्पर्धेत चेंडूचा मार लागल्याने त्याच्या पायाला दुखापत झाली होती. तसंच त्याच्यावर सध्या बेंगळुरूमध्ये उपचार सुरू आहेत. त्यातून तो लगेच पूर्णपणे बरा होण्याची शक्यता नाही. तसंच विश्वचषक स्पर्धेसाठी फिट होण्याचा तर विचारही करता येणार नाही.

हेही वाचा..

  1. Cricket World Cup 2023 : भारतीय संघात विश्वकप जिंकण्याची क्षमता - चंचल भट्टाचार्य
  2. Cricket World Cup 2023 : असाही दुर्विलास! एकेकाळच्या विश्वविजेता कर्णधाराला सामना पाहण्यासाठी घ्यावी लागेल तुरुंग अधिकाऱ्यांची परवानगी
  3. Cricket World Cup : १९७५ पासून २०१९ विश्वचषकातील कामगिरी; प्रत्येक विश्वचषकात टीम इंडियाची कामगिरी कशी होती? जाणून घ्या सोप्या शब्दात

ABOUT THE AUTHOR

...view details