महाराष्ट्र

maharashtra

शेकोटी पेटवत ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेमध्ये होणार हुरडा पार्टी !

By

Published : Jan 23, 2021, 2:39 AM IST

थंडीत हुरडा पार्टी करण्याची संधी अभि आणि लतिकाच्या परिवाराने काही सोडली नाही. हिवाळा आला, की हुरडा पार्टीला जायचे बेत ठरू लागतात. आता या पार्टीमध्ये नक्की सगळ्यांनी मिळून काय काय मज्जा केली हे लवकरच मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे. मस्त शेकोटी पेटवून सगळं कुटुंब या हुरडा पार्टीची मज्जा घेणार आहे. माई, अप्पा, अभी, लतिका, लतिकाचे आई वडील आणि आजीसुद्धा.

सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेमध्ये होणार हुरडा पार्टी
सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेमध्ये होणार हुरडा पार्टी

मुंबई - महाराष्ट्रात थंडी वाढली की ‘हुरडा पार्टी’ करण्याची प्रथा आहे. सध्या थंडीचे दिवस सुरु आहेत व बाहेरगावच्या शूटिंगच्या सेटवर सर्व युनिट हुरडा पार्टीचा आनंद लुटत आहेत. आता ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेचेच उदाहरण घ्या ना. या मालिकेतील सर्वांनी नुकतीच हुरडा पार्टी केली व जल्लोष करत मज्जा केली.

‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेमध्ये बर्‍याच घटना घडत आहेत, मग ते कामिनीचे घरात येऊन लतिकाचा अपमान करणं असो वा अभिमन्यूची लतिकाला साथ मिळणं असो. मालिकेमध्ये अभिमन्यू आणि लतिकाचे वेगळे नाते बघायला मिळत आहे. त्यांच्यात कितीही मतभेद असले तरीदेखील संकटामध्ये ते एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहतात. मग ते अभिचे स्वप्न पूर्ण करायचे असो वा दौलतच्या विरुध्द उभे राहायचे असो. अभिमन्यूचे अकॅडमीचे स्वप्न लतिकाच्या साथीने आणि पुढाकाराने पूर्ण होताना दिसते आहे तर अभिच्या साथीने लतिकाने आता जाहिरात करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे आणि त्याला अप्पांचीदेखील परवानगी मिळाली आहे. आता लवकरच अकॅडमी जिथे बनणार आहे त्या जागेचे भूमिपूजन देखील होणार आहे. हा दिवस अभिमन्यूसाठी खूप मोठा आहे. घरातील सगळेच खूप खूष आहेत. दुसरीकडे कामिनी आणि दौलत बरेच नाराज आहेत. आता भूमिपूजनानंतर जहागीरदार कुटुंब एकत्र मिळून हुरडा पार्टी करणार आहेत.

सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेमध्ये होणार हुरडा पार्टी
थंडी अजूनही काही कमी होत नाही. त्यामुळे या थंडीत हुरडा पार्टी करण्याची संधी अभि आणि लतिकाच्या परिवाराने काही सोडली नाही. हिवाळा आला, की हुरडा पार्टीला जायचे बेत ठरू लागतात. आता या पार्टीमध्ये नक्की सगळ्यांनी मिळून काय काय मज्जा केली हे लवकरच मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे. मस्त शेकोटी पेटवून सगळं कुटुंब या हुरडा पार्टीची मज्जा घेणार आहे. माई, अप्पा, अभी, लतिका, लतिकाचे आई वडील आणि आजीसुद्धा.‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेचा विशेष भाग प्रसारित होणार आहे कलर्स मराठीवर.

ABOUT THE AUTHOR

...view details