महाराष्ट्र

maharashtra

४ दिवसांतच गेल्या पर्वातल्या ‘कोण होणार करोडपती' च्या प्रवेशांचा उच्चांक मोडला गेलाय!

By

Published : Apr 1, 2021, 3:08 PM IST

सोनी मराठीवर सुरू होणाऱ्या 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी सुरू झाली आणि प्रेक्षकांनी त्याला उदंड प्रतिसाद दिला. पहिल्या चार दिवसांतच गेल्या पर्वातल्या प्रवेशांचा उच्चांक मोडला आहे.

registration of 'Kon Honar Karodpati'
कोण होणार करोडपती' नोंदणीला प्रतिसाद

पैसे मिळविणे कोणाला नको असतं? आणि बुद्धीच्या जोरावर अत्यंत कमी वेळात करोडपती होण्याची संधी मिळत असेल तर कोण नाही म्हणेल? ‘कौन बनेगा करोडपती’ ची मराठी आवृत्ती ‘कोण होणार करोडपती' ने अल्पावधीतच लोकप्रियता मिळविली. आता तो कार्यक्रम दुसरा सिझन घेऊन येत आहे. सोनी मराठीवर सुरू होणाऱ्या 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी सुरू झाली आणि प्रेक्षकांनी त्याला उदंड प्रतिसाद दिला. पहिल्या चार दिवसांतच गेल्या पर्वातल्या प्रवेशांचा उच्चांक मोडला आहे.

हेही वाचा - अभिनेता रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

आत्तापर्यंत नोंदणीसाठी मिळालेला प्रतिसाद बघता महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांचे 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाबद्दलचे औत्सुक्य दिसून येते आहे. जर तुमच्याकडे ज्ञान असेल, तर तुम्ही त्या जोरावर हॉटसीटवर बसू शकता आणि करोडपतीही होऊ शकता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अभिनेता सचिन खेडेकर करणार आहे.

ज्ञानाच्या जोरावर करोडपती होण्याची आणि आपलं नशीब अजमावायची संधी हा कार्यक्रम सामान्यजनांसाठी घेऊन आला आहे. या कार्यक्रमाच्या जाहिरातीमध्ये म्हटल्याप्रमाणे मिस्ड कॉल म्हणजे एक करोडचा कॉल ठरणार आहे. कारण फक्त एक मिस्ड कॉल देऊन प्रेक्षक या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी करू शकतात. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भरपूर प्रतिसाद मिळतो आहे. यंदाचं पर्व कसं वेगळं असेल, हे पाहणं सगळ्यांसाठीच उत्सुकतेचं असणार आहे.

हेही वाचा - एच. डी. देवेगौडा आणि पत्नी चेनम्मा यांना कोरोनाची लागण

ABOUT THE AUTHOR

...view details