महाराष्ट्र

maharashtra

...म्हणून आयफा पुरस्कार सोहळ्यात परफॉर्म करणं सारा अली खानसाठी असणार खास

By

Published : Sep 16, 2019, 5:52 PM IST

बॉलिवूडमध्ये केवळ दोनच चित्रपटातून साराने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता ती फक्त सैफ अली खानची मुलगी म्हणूनच नाही, तर अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

...म्हणून आयफा पुरस्कार सोहळ्यात परफॉर्म करणं सारा अली खानसाठी असणार खास

मुंबई - बॉलिवूडमध्ये 'केदारनाथ' चित्रपटातून सैफ अली खानची मुलगी सारा हिने पदार्पण केलं आहे. पहिल्याच चित्रपटातून तिने मोठ्या प्रमाणात लोकप्रियताही मिळवली आहे. बॉलिवूडमध्ये केवळ दोनच चित्रपटातून तिने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता ती फक्त सैफ अली खानची मुलगी म्हणूनच नाही, तर अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. यावेळी ती पहिल्यांदाच आयफा पुरस्कार सोहळ्यात सहभागी होणार आहे. या सोहळ्यात सहभागी होऊन परफॉर्मन्स करणं खास असल्याचं तिने म्हटलं आहे.

सारा अली खान

आयफा पुरस्कार सोहळ्यात सारा तिच्याच चित्रपटातील गाण्यावर परफॉर्म करणार आहे. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी खूप उत्साही असल्याचं तिनं सांगितलं. बालपणापासूनच ती हा सोहळा पाहत आहे. एकदा ती सैफ अली खानसोबत गेली असताना तिला या सोहळ्यात सहभागी व्हायचं होतं. मात्र, तेव्हा ती अभिनेत्री नव्हती. तिला या सोहळ्याचं आमंत्रणही देण्यात आलं नव्हतं. मात्र, यावेळी तिला या पुरस्कार सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलं आहे. त्यामुळे हा पुरस्कार सोहळा माझ्यासाठी खूप खास असल्याचं तिनं म्हटलं आहे.

साराने या सोहळ्यात परफॉर्म करण्यासाठी खास तयारी देखील केली आहे. ती या सोहळ्यात तिच्या गाण्याशिवाय तिच्या आई-वडिलांच्या गाण्यावरही परफॉर्म करणार आहे. तसंच माधुरी दिक्षीत आणि रणवीर सिंगसोबतही ती परफॉर्म करणार आहे.

हेही वाचा- रणबीरसाठी 'ही' गोष्ट आहे 'लकी चार्म', सोनम कपूरने शेअर केला व्हिडिओ

यंदा आयफा पुरस्काराचा २० वा सीझन आहे. मुंबईत हा सोहळा पार पडणार आहे. चित्रपटसृष्टीत या सोहळ्याचे फार महत्व आहे. आत्तापर्यंत वेगवेगळ्या देशातील १६ ठिकाणी हा सोहळा पार पडला आहे. यामध्ये अॅम्स्टरडम, दुबई, टोरान्टो, ताम्पा बे आणि कुआला लामपूर यांसारख्या शहरांचा समावेश आहे. यावेळी मात्र, भारतातच हा सोहळा आयोजित केल्यामुळे कलाकारांमध्ये उत्साह पाहायला मिळतो.

हेही वाचा- पाहा फोटो, रॅपर विझ खलिफाच्या भेटीला धकधक गर्ल माधुरी दीक्षित

Bollywood


Conclusion:

ABOUT THE AUTHOR

...view details