ETV Bharat / sitara

रणबीरसाठी 'ही' गोष्ट आहे 'लकी चार्म', सोनम कपूरने शेअर केला व्हिडिओ

author img

By

Published : Sep 16, 2019, 5:30 PM IST

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर याच्यासाठी देखील एक गोष्ट लकी चार्म आहे. ती नेमकी काय आहे, हे त्यानेच एकाच व्हिडिओतून सांगितलं आहे.

रणबीरसाठी 'ही' गोष्ट आहे 'लकी चार्म', सोनम कपूरने शेअर केला व्हिडिओ

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर सध्या तिच्या 'द झोया फॅक्टर' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. रोमॅन्टिक कॉमेडी असलेला हा चित्रपट सध्या प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. तिच्यासोबत दाक्षिणात्य स्टार दुलकर सलमान हा देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. तो या चित्रपटात क्रिकेटरची भूमिका साकारत आहे. तर, सोनम म्हणजेच 'झोया' ही भारतीय क्रिकेट संघासाठी लकी चार्म असल्याचं दाखवण्यात येणार आहे. बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर याच्यासाठी देखील एक गोष्ट लकी चार्म आहे. ती नेमकी काय आहे, हे त्यानेच एकाच व्हिडिओतून सांगितलं आहे.

सोनम कपूरने रणबीरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रणबीरने त्याच्या लकी चार्मचा खुलासा केला आहे. रणबीरला लहानपणापासून ८ या आकड्यावर विश्वास आहे. ८ हा आकडा त्याच्यासाठी लकी असल्याचं त्यानं सांगितलं आहे. कारच्या नंबर प्लेटवरील आकड्यांचीही बेरीज ८ असेल, अशाच कारची तो निवड करतो. विशेष म्हणजे रणबीरची आई नीतू कपूर यांचा वाढदिवसही ८ तारखेला असतो. त्यामुळे ८ हा आकडा त्याच्यासाठी लकी असल्याचा खुलासा त्याने केला आहे.

रणबीरने त्याचा व्हिडिओ सोनमला शेअर केल्यानंतर सोनमने हा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

हेही वाचा -'या' खतरनाक व्हिलनचा मुलगा करणार बॉलिवूड डेब्यू, पाहा फोटो

सोनमने रणबीरसोबत 'संजू' चित्रपटात भूमिका साकारली होती. या चित्रपटात तिने संजय दत्तच्या गर्लफ्रेन्डची भूमिका साकारली होती.

सोनम आणि दुलकर सध्या त्यांच्या 'द झोया फॅक्टर' या चित्रपटाचं प्रमोशन करण्यात व्यग्र आहेत. अभिषेक शर्मा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर, अनुजा चौहाण यांच्या कादंबरीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. २० सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होईल.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

हेही वाचा -'ड्रीमगर्ल'ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी वाटचाल, जाणून घ्या आत्तापर्यंतची कमाई

Intro:Body:

Bollywood


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.