ETV Bharat / sitara

पाहा फोटो, रॅपर विझ खलिफाच्या भेटीला धकधक गर्ल माधुरी दीक्षित

author img

By

Published : Sep 16, 2019, 5:09 PM IST

रॅपर विझ खलिफाचा रविवारी मुंबईत शो पार पडला. त्यावेळी इशा अंबानी, पती आणि मुलांसह माधुरी उपस्थित होती.

विझ खलिफाच्या भेटीला माधुरी दीक्षित


मुंबई - आंतरराष्ट्रीय ख्यातीचा अमेरिकन रॅपर विझ खलिफा याचा दमदार परफॉर्मन्स मुंबईत पार पडला. या शोला धकधक गर्ल माधुरी दीक्षितने हजेरी लावली होती. सोमवारी सकाळी तिने खलिफासोबतचा एक फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत माधुरीसोबत पती श्रीराम नेणे, मुलगा रायान आणि मुकेश अंबानी यांची मुलगी इशा अंबानीदेखील उपस्थित होते.

या फोटोमध्ये माधुरी, खलिफा आणि गायिका राजा कुमारीसोबत स्माईलच्या पोजमध्ये दिसत आहे. संगीताला कोणतीही सीमा अडवू शकत नसल्याचे खलिफाच्या शोमुळे सिध्द झाले. त्याच्या गाण्यांनी सुंदर वेळ खर्ची पडल्याचे, तिने फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

विझ खलिफाचा रविवारी मुंबईत शो पार पडला. त्यावेळी इशा अंबानी, पती आणि मुलांसह माधुरी उपस्थित होती. यावेळचे तिचे फोटो आपण पाहू शकतो.

माधुरी सध्या 'डान्स दिवाने' या शोच्या दुसऱ्या पर्वाचे परिक्षक म्हणून काम पाहते. सध्या तिच्या हातात इंद्रकुमार यांचा 'टोटल धमाल' हा चित्रपट आहे. यामध्ये अनिल कपूर, अजय देवगण, रितेश देशमुख आणि अर्शद वारसी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

अलिकडे करण जोहरच्या 'कलंक' या चित्रपटात माधुरी दीक्षित झळकली होती. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फारसी कमाल करु शकला नव्हता.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.