महाराष्ट्र

maharashtra

Kangana's statement is childish : कंगनाचे विधान बालीश, हास्यास्पद आणि चापलूसीने प्रेरित - मुकेश खन्ना

By

Published : Nov 22, 2021, 7:08 PM IST

कंगना रणौतच्या 'भीक मागणे' या वक्तव्यावर (Kangana's begging statement)महाभारतातील भीष्म पितामहची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता मुकेश खन्ना (Actor Mukesh Khanna)यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून अभिनेत्री कंगनाला फटकारले आहे. मुकेश खन्नाने कंगनाला चापलूस म्हटले आहे.

कंगनाचे विधान बालीश
कंगनाचे विधान बालीश

हैदराबाद : अभिनेता मुकेश खन्ना (Actor Mukesh Khanna)देशाच्या प्रत्येक मुद्द्यावर आपले मत मोकळेपणाने व्यक्त करीत असतो. अलीकडेच त्यांनी कंगना राणौतच्या 'भीक मागणे' या विधानावर (Kangana's begging statement)टीका केली आहे. या मुकेश खन्नाने कंगनाला तिच्या या वादग्रस्त वक्तव्याबद्दल खडे बोल सुनावले आहेत. कंगनाने पुरस्कार मिळाल्यानंतर देशाच्या स्वातंत्र्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते.

कंगनाच्या वादग्रस्त विदानाशी मुकेश खन्ना असहमत

मुकेश खन्नाने त्याच्या इंस्टाग्रामवर कंगनाच्या फोटोसह एक नोट पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय, "काही लोक मला वारंवार सांगताहेत की भारताला मिळालेल्या स्वातंत्र्याबद्दल तू केलेल्या वक्तव्यावर मी काहीही भाष्य केलेले नाही. का?

तर मी सांगतो. मी बोललोय पण कदाचीत वाचला नसाल. तेव्हा म्हटलं पब्लिकली सांगावं. माझ्या दृष्टीने हे भाष्य बालीश होते (Kangana's statement is childish). हास्यास्पद होते. चापलूसीने प्रेरित होते. अज्ञान दर्शवत होते की पद्म पुरस्काराचा हा साईड इफेक्ट होता. परंतु सर्वजण हे जाणतात आणि मानतात की आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला होता. याकडे कानाडोळा करणे मुर्खतेपेक्षा वेगळे काही नाही."

परंतु हा खुलासाही करू इच्छितो की..दे दी हमें आज़ादी बिना खड़ग बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल.. हे गाणे वास्तवापासून तितकेच दूर आहे जितके की तूझे विधान. वास्तव हे आहे की इंग्रज शासकांनी देश सोडण्याचा निर्णय घेतला तो असंख्य क्रांतिकारकांच्या बलिदानामुळे, सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेमुळे आणि आपल्याच सैनिकांनी केलेल्या उठावामुळे. तेव्हा वादग्रस्त विधाने करणे तातडीने बंद कर!!"

वीर दासवरही भडकले मुकेश खन्ना

यापूर्वी मुकेश खन्नाने वीर दास यांच्या दोन भारताच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला होता. वीर दासयाला जेवढ्या टाळ्या मिळाल्या, तेवढ्याच फटके आपल्या देशवासियांकडून मिळायला हवेत, असेही ते म्हणाले. मुकेश खन्ना पुढे म्हणाले, 'या वीरदासला काय सिद्ध करायचे आहे की त्याच्यात एवढी हिंमत आहे की तो संपूर्ण देशाविरुद्ध बोलू शकतो आणि तो आपल्या देशाचे नावही परदेशात सभागृहात खराब करतोय आणि इथे दुष्कृत्य करतोय?'

काय म्हणाली होती कंगना रणौत?

कंगनाने नुकतीच एका खासगी वाहिनीच्या कार्यक्रमास हजेरी लावली होती. यावेळी दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, की सावरकर, राणी लक्ष्मीबाई, सुभाषचंद्र बोस यांना स्वातंत्र्यासाठी रक्त सांडणार हे माहीत होते. मात्र भारतीयांकडूनच भारतीयांवर वार होणार नाही हे ध्यानात ठेवायला हवे. स्वातंत्र्यासाठी नक्कीच त्यांचे मोलाचे योगदान आहे. मात्र ते स्वातंत्र्य नव्हते, ती भीक होती. जे स्वातंत्र्य मिळाले ते २०१४ सालामध्ये मिळाले” अशी मुक्ताफळे तिने उधळली आहेत. दरम्यान, यावरून कंगना ट्रोल होत आहे.

हेही वाचा - #Covid19 संसर्ग : कमल हासन यांना कोरोनाचा संसर्ग, काळजी घेण्याचे केले आवाहन

ABOUT THE AUTHOR

...view details