महाराष्ट्र

maharashtra

Russia declares ceasefire in Ukraine : हल्ले थांबणार, रशियाकडून युक्रेनच्या दोन शहरांमध्ये तात्पुरता युद्धविराम

By

Published : Mar 5, 2022, 12:36 PM IST

Updated : Mar 5, 2022, 12:55 PM IST

रशियाने आज तात्पुरती युद्धबंदीची घोषणा ( Russia declares ceasefire in Ukraine ) केली. सामान्य नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्यासाठी कॉरडॉर देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध ( Russia Ukraine War ) सुरू आहे.

Russia declares ceasefire in Ukraine
रशिया

मॉस्को -गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध ( Russia Ukraine War ) सुरू आहे. दिवसेंदिवस रशिया आधिक आक्रमक होत असल्याचे दिसून येत होते. रशियाने युक्रेनवर होत असलेल्या हल्ल्यात अनेक सामान्या निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यावर संपूर्ण जगभरातून रशियावर टीका होत आहे. यातच रशियाने आज तात्पुरती युद्धबंदीची घोषणा ( Russia declares ceasefire in Ukraine ) केली. सामान्य नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्यासाठी कॉरडॉर देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

युक्रनेच्या दोन शहरात रशियाने युद्धबंदी लागू केली आहे. मारियोपोल आणि ओलवोव्हाखा या शहरात युद्धविराम दिला आहे. आज रशिया-युक्रेनमधील युद्धाचा दहावा दिवस आहे. रशियाच्या या निर्णयाचा मोठा फायदा भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांना होईल. एकूणच हा युद्धविराम 5 तासांसाठी असल्याची माहिती आहे. युद्धविराम झाल्याने या काळात नागरिक सुरक्षित स्थळी जाऊ शकतात. नागरिकांना बाहेर काढण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे रशियाने म्हटलं आहे.

रशियाने युद्धविराम केल्याने याचा मोठा फायदा भारताला होणार आहे. कारण, यामुळे युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी सुरक्षीतरित्या सीमेवर पोहचू शकतात. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धात एका भारतीय विद्यार्थ्याला आपले प्राण गमावावे लागले आहेत. तर एक विद्यार्थ्याला गोळी लागली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रशियाने काहीकाळासाठी युद्ध थांबवल्याने अनेंकाना स्थलातंर करण्यासाठी वेळ मिळेल.

रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारल्यापासून अनेक युक्रेनचे नागरिक देश सोडून गेले आहेत. तर काहींनी आपल्या कुटुंबाला देशाबाहेर ठेवले असून रशियाविरोधात मैदानात उतरले आहेत. युद्ध थांबवण्यासाठी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी युक्रेनसमोर ठेवल्या तीन अटी ठेवल्याची माहिती आहे.

रशियाने मांडल्या तीन अटी -

युक्रेन आणि रशिया यांच्यात चर्चेतून कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. आपल्या मागण्या मान्य झाल्या तरच शक्य असल्याचं पुतीन यांनी म्हटलं आहे. रशियाने तीन अटी मांडल्या आहेत. युक्रेननं तटस्थ आणि अण्वस्त्र नसलेला देश होणं, त्यांच्याद्वारे क्रिमियाला रशियाचा भाग मानणं आणि पूर्व युक्रेनच्या फुटीरतावादी प्रदेशांचे सार्वभौमत्व समावेश आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये चर्चेची तिसरी फेरी होणार आहे.

युक्रेनचे महत्त्व -

युक्रेन हा भारतासारखाच बहुभाषिक देश असून रशिया आणि युक्रेनियन लोकांचा वंश एकच म्हणजे स्लॉव्ह आहे. मात्र, या देशाचे दोन ठळक भाग आहेत. पश्चिमेकडील भागावर युरोपचा मोठा प्रभाव आहे. तर पूर्वेकडील भागावर रशियाचा प्रभाव आहे. युक्रेन हा युरोप आणि रशिया यांच्या दरम्यान असल्याने दोन्ही तो आपल्या प्रभावाखाली असावा, असे युरोपीय देश आणि रशिया या दोघांनाही वाटते. आर्थिक कारणांबरोबरच सामरिक कारणही तितकेच महत्त्वाचे आहे. आता पुतीन यांनी युद्ध पुकारल्याने हे युरोपातील 1945 नंतरचं सगळ्यात मोठं युद्ध असेल. केवळ युक्रेनची नव्हे तर रशियाचीही या युद्धात मोठी जीवितहानी होत आहे.

हेही वाचा -Russia-Ukraine Crisis : युक्रेनमधुन पुण्यातील 16 विद्यार्थ्यांचे पुणे विमानतळावर आगमन, विद्यार्थ्यांनी सांगितला संघर्षमय प्रवास

Last Updated : Mar 5, 2022, 12:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details